महाराष्ट्र

कै.मच्छिंद्र मामा खुर्द वाचनालय बचेरीचा 24 वा वर्धापन दिन व थोर समाजसेवक कै.मच्छिंद्र मामा खुर्द यांची 83 वी जयंती समारंभ संपन्न

कै.मच्छिंद्र मामा खुर्द वाचनालय बचेरीचा 24 वा वर्धापन दिन व थोर समाजसेवक कै.मच्छिंद्र मामा खुर्द यांची 83 वी जयंती समारंभानिमित्त रविवार दि 11 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ बिरू ज्ञानू राजगे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य संतोषकुमार आबासाहेब शेंडगे हे उपस्थित होते. वाचनालयातर्फे यावर्षी पासून सुरु केलेला कै मच्छिंद्र मामा खुर्द ग्रंथमित्र पुरस्कार शेषागिरी राव नर्रा (चेअरमन, सद्गुरु श्री श्री साखर कारखाना ) यांचे स्वीय सहायक क्षिरसागर यांनी स्विकारला व प्रा संतोष पांडुरंग माने यांचा ग्रंथमित्र पुरस्कार सौ.उमा माने याना मान्यवरांचे हस्ते वितरित करण्यात आला. वाचनालयाचे गेले 20 वर्षांपासून चे नियमित आदर्श वाचक श्री श्रीमंत कारंडे यांचा सन्मान करण्यात आला . जि प प्रा शाळा बचेरीच्या तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन गुण गौरव करण्यात आला .

प्रमुख पाहुणे प्रा डॉ बिरू राजगे यांनी ग्रामीण भागातील वाचनालयाच्या नावीन्य पूर्ण योजनाचे कौतुक केले. दर शनिवारी शाळेत जाऊन ग्रंथ देवघेव करणे, रात्री 7 ते 9 या वेळेत प्रत्येकाच्या घरातील मोबाईल टीव्ही बंद करून मुलांना अभ्यासासाठी बसवणेसाठी वाचनालय इमारतीवर वाचनालयाने सायरण बसवला आहे व सायरण गेले वर्षभरापासून रात्री नियमित जाणीव जागृतीसाठी वाजवीला जातो.याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. यासाठी पालकांनी विशेष लक्ष देऊन आपल्या मुलामुलींना वाचनालयाचा लाभ घ्यायला लावावा एक दिवस बचेरी गाव नक्की अधिकार्‍यांचे गाव होईल यात शंका नाही असे डॉ राजगे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा संतोष शेंडगे यांनी ग्रामीण भागातील वाचनालयाच्या अविरत कार्याचा गौरव केला. व मुलींसाठी वाचनालय चांगले काम करत आहे, आम्हीही यासाठी मोलाचे सहकार्य करू असे सांगितले.
नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री धुळा ठेंगील, करमाळकर गुरुजीं, ग्रामपंचायत सदस्य सौ पूजा थिटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ अस्मिता शिंदे यांनी केले.
प्रास्ताविकामधून अध्यक्ष प्रा.सदाशिव शिंदे यांनी वाचनालयच्या गेल्या 23 वर्षातील प्रगतीचा व शैक्षणिक प्रगतीसाठी, वाचन संस्कृती वाढवणेसाठी सुरु केलेल्या नावीन्यपूर्ण शाळा दत्तक योजना, रात्र अभ्यासिका, मोबाईल टीव्ही बंद करणेसाठी सुरु असलेल्या सायरण वाजवणे योजना याचा आढावा मांडला.
कार्यक्रमासाठी श्री.दत्त्तात्रय यादव, श्री हैबत शिंदे, श्री दशरथ गोरड, सौ.महादेवी गटकुळे, श्री.पिसे, ग्रा पं सदस्य सौ ताई शिंदे, श्री अमोल काटे, श्री सागर शिंदे, राजू शिंदे यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!