जि.प.प्रा.केंद्रशाळा महुद बु शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न
![](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240219-WA0063-780x470.jpg)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महुद शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ जाधव सर, शिक्षक नेते-श्री तानाजी खबाले सर यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांमधून दक्ष सोमनाथ घाडगे,, मनस्वी अरुण नागणे, आरोही अविनाश शेटे , त्रिशा चंद्रशेखर खांडेकर यांनी सांगितली. सई धीरज जाधव या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचा पोवाडा सादरीकरण केला.शिक्षकांमधून श्री-दऱ्याबा येडगे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. श्रीमती वंदना पाटणे मॅडम यांनी जाणता राजा या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा दक्ष सोमनाथ घाडगे याने साकारली. जिजामातेंची वेशभूषा मनस्वी अरुण नागणे या विद्यार्थिनीने साकारली. सईबाईंची वेशभूषा आरोही अविनाश शेटे या विद्यार्थिनीने साकारली. कार्यक्रमासाठी महुद शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ जाधव सर, शिक्षक नेते श्री तानाजी खबाले सर, श्री महादेव नागणे सर, श्री शंकर कांबळे सर, श्री दऱ्याबा येडगे सर, श्री दत्तात्रय लोखंडे सर,श्रीमती सरोजिनी देशमुख मॅडम, श्रीमती मीनाक्षी दिवटे मॅडम, श्रीमती वंदना पाटणे मॅडम, पालक सौ सुवर्णा शेटे, ग्रामस्थ-श्री रवींद्र काटकर उपस्थित होते.*