जवळे ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी.
जवळे(प्रशांत चव्हाण)जवळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ.सुषमाताई घुले-सरकार यांच्या हस्ते करण्यात आले.व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सदरप्रसंगी जवळे तंटामुक्त अध्यक्ष श्री.अरुण भाऊ घुले-सरकार उपसरपंच नवाज खलिफा,श्री.सुनील आबा साळुंखे,श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी,श्री.दत्ता बर्वे,श्री.बाबासाहेब इमडे,श्री.रामराव घाडगे,श्री.अनिल साळुंखे,श्री.विकास साळुंखे,श्री.अनिल सुतार श्री.पोपट नाडगे,ग्रामविकास अधिकारी श्री.रसाळ भाऊसाहेब कृषी सहाय्यक श्री.प्रतीक डुबल, ग्रामपंचायत सदस्य श्री.विठ्ठल गयाळी श्री.बंडू साळुंखे,श्री.निसार शेख,श्री.सज्जन मागाडे,सौ. मीनाताई सुतार,श्रीमती लीलावती मेहेत्रे यांचे सह ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.