जवळे येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
जवळे(प्रशांत चव्हाण)जवळे येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात करण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळे येथील फळ विक्रेते शब्बीर अशरफ बागवान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी बाल चमूंचा उत्साह दिसून आला.जय भवानी जय शिवाजी आशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
सदरप्रसंगी तंटामुक्त श्री.अरुण भाऊ घुले-सरकार,उपसरपंच श्री.नवाज खलिफा, युवक नेते श्री.वैभव देशमुख,श्री.सुनील आबा साळुंखे,श्री.दत्ता बर्वे,श्री.बाबासाहेब इमडे,श्री.अनिल साळुंखे(चेअरमन) श्री.बटू पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. विठ्ठल गयाळी,श्री.निसार शेख,श्री.अतुल चव्हाण,श्री.सागर मोहिते, श्री.राहुल धुमाळ,श्री.अवि घाडगे,श्री.विनायक वास्ते श्री.महेश भोसले,श्री.विशाल चडचणकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.