सांगोला तालुकाक्राईममहाराष्ट्रराजकीय

वारकरी अपघात; अज्ञात वाहनाचा ४८ त्तासात शोध; चालकास अटक

सांगोला (तालुका प्रतिनिधी) पंढरपूर कडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील वारकऱ्यांना अज्ञात भरधाव वाहनाने  धडक देवून वाहन पसार झाले होते या अपघातात एक वारकरी ठार तर इतर पाच वारकरी जखमी झाले होते सांगोला पोलिसांनी या अज्ञात वाहनाचा ४८ त्तासात शोध घेवून सदर अपघातातील रुग्णवाहिका व चालक असिफ सय्यद रा.चांदणी चौक सांगली यास ताब्यात घेतले आहे ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम गायकवाड, पोनि भिमराव खंणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी आदिनाथ  खरात व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
               उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी अपघात स्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे वेगाने हलवली अपघाताच्या दरम्यान कोण – कोणती चारचाकी वाहने या हायवेवरून पुढे गेली , याबाबतची माहिती टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून गोपनीय माहितीच्या आधारे मिरज येथून एम एच -११-एम -३५३६ ही रुग्णवाहिकेसह चालक असिफ अबुबकर महाबरी यास ताब्यात घेवून ४८ तासात अपघाताचा तपास लावला आहे.
       पंढरपूरला माघी वारीसाठी पायी जाणाऱ्या कर्नाटक राज्यातील वारकरी भाविकांच्या दिंडीत पाठीमागून चारचाकी वाहन घुसल्याने गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ च्या सुमारास सांगोला – मिरज रोडवरील काळू बाळू वाडी ता. सांगोला येथे अपघात घडला होता. या अपघातात ज्ञानू बाळू पाटील  या ५२ वर्षीय वारकरी भाविकाचा मुत्यु झाला होता व इतर पाच वारकरी जखमी झाले होते अपघातानंतर चालक रुग्णवाहिका घेऊन पसार झाला होता.सदर रुग्णवाहिका ही  मिरज येथून मृतदेह घेऊन भरधाव वेगाने  सोनंद ता. सांगोला येथे जाताना  मिरज हायवेवरील काळू बाळू वाडी येथे आल्यावर पाठीमागून दिंडीत घुसून अपघातानंतर न थांबता निघून गेली होती असे पोलीस तपासात निष्पन्न झाले दरम्यान चालक असिफ सय्यद याने सोनंद येथे मृतदेह सोडून मिरज येथे आल्यानंतर अपघातग्रस्त कारची गॅरेजवर दुरुस्ती सुरू केली होती तत्पूर्वीच पोलिसांनी  रुग्णवाहिकेसह चालकास ताब्यात घेवून त्यास अटक केली. मिरज येथून रुग्णवाहिकेसह चालक असिफ सय्यद रा चांदणी चौक सांगली यास ताब्यात घेवून अटक केली दरम्यान पोलिसांनी त्यास सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश यांनी आरोपी असिफ सय्यद यास न्यायालयालीन कोठडी सुनावली आहे.ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड , पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात व इतर पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!