सांगोला तालुकामहाराष्ट्र

*सांगोला लायन्सकडून कर्करोग उपचारासाठी आर्थिक मदत*

सांगोला ( प्रतिनिधी ) माजी प्रांतपाल ला. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला नेहमी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, क्षेत्रात समाजहितासाठी कार्यरत आहे.यामध्ये आरोग्य क्षेत्रात क्लब कडून नेहमी विविध गावांमध्ये मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे घेतली जातात यावर्षी घेतलेले मोफत हाडांची ठिसूळता तपासणी शिबिर व महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिर महत्त्वपूर्ण ठरले आहे. हा विचार प्रमाण मानून वाटंबरे तालुका सांगोला येथील दिगंबर भागवत साळुंखे यांच्या पत्नीच्या कर्करोग वैद्यकीय उपचारासाठी लायन्स क्लब ऑफ सांगोलाकडून तेवीस हजार सातशे रुपये आर्थिक मदत लायन्स क्लब सांगोला अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर व कॅबिनेट ऑफिसर सीए उत्तम बनकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.

 

यावेळी मा. प्रांतपाल व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष मार्गदर्शक ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, उपप्राचार्य ला.शहिदा सय्यद, सांगोला लायन्स क्लबचे सचिव ला.अजिंक्य झपके, जीएमटी चेअरमन ला.मिलिंद फाळके,पीआरओ ला.यतिराज सुरवसे,टेल टेमर ला.दतात्रय देशमुख, सदस्य ला.मंगेश म्हमाणे,ला.बाळराजे सावंत ला.शैलजा झपके उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!