सांगोला तालुकामहाराष्ट्र

*सामाजिक बांधिलकीमुळे लायन्सचे सेवाकार्य अद्वितीय- ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके*

सांगोला (प्रतिनिधी) लायन्स क्लबच्या माध्यमातून कल्याणकारी कार्यात मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, गरजूंना व अपंगांना वैद्यकीय उपचार शैक्षणिक ,आरोग्यविषयक व सामाजिक क्षेत्रातील अद्वितीय सेवाकार्य प्रत्येक लायन्स सदस्याच्या सामाजिक बांधिलकीतूनच होते आहे.असे प्रतिपादन माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.

लायनिझममध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात माजी प्रांतपाल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून माजी प्रांतपाल यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो.यानुसार सांगोला लायन्स क्लबकडून माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा सत्कार क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेष आटपाडीकर यांचे हस्ते सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे संपन्न झाला.या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य गंगाधर घोंगडे,झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.

पुढे बोलताना ला.प्रा.झपके म्हणाले यांनी लायन्स मधील रुजलेली लोकशाही, सेवाभाव सामाजिक कार्यासाठी उर्मी देणारा आहे.त्यामुळेच तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून सांगोला लायन्स क्लबकडून चांगले सेवाकार्य होत आहे याचा मला आनंद आहे. असे सांगत सत्कारासाठी सांगोला क्लबला धन्यवाद दिले.

या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ सांगोला सचिव ला.अजिंक्य झपके, पदाधिकारी,सदस्य, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजधील प्रशासकीय अधिकारी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ला.उन्मेष आटपाडीकर यांनी केले. ला. शैलजा झपके यांनी आभार प्रदर्शन केले.

 

*चौकट* – ‘जो जे वांछील तो ते लाहो ‘. या संतज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विचाराप्रमाणे माजी प्रांतपाल मार्गदर्शक आदरणीय ला. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यानी शैक्षणिक ,सामाजिक व इतर क्षेत्रात अनेकांना सकारात्मकतेसाठी दिशा देत हित साधण्याचा पोटतिडकीने प्रयत्न केला आहे.तसेच सर्वसामान्यांच्या अभ्युदयासाठी लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांच्याकडून झालेले अमोघ कार्य मौलिक आहे. या भावनेतून सांगोला क्लबकडून ज्ञानेश्वर महाराज मूर्ती भेट व तुळशीचा हार घालून केलेला सन्मान अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!