सांगोला विद्यामंदिरमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा झाला.
सुरूवातीला शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या प्रतिमेला व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, प्राचार्य गंगाधर घोंगडे,उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज इलेक्ट्रॉनिक्स विभागाने राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त लेझर सिक्युरिटी अलार्म सिस्टीम,स्मार्ट डस्टबिन,फायर फायटिंग रोबोट,थर्ड आय फॉर ब्लाइंड,वॉटर लेवल इंडिकेटर,फ्युयल फ्लो मीटर,थर्ड आय ,फायर अलार्म,मेटल डिटेक्टर इत्यादी महत्त्वाच्या प्रयोगाचे सादरीकरण केले.यासाठी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा.पी.एल.केंगार व प्रा.एस.एस केदार यांचे मार्गदर्शन लाभले