महाराष्ट्र

मिसेस सांगोला स्पर्धा 2025 महिलांचा प्रचंड मोठा प्रतिसादात संपन्न.

श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी महिला मंच, सांगोला आयोजित 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून मिसेस सांगोला 2025 ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मिसेस सांगोला 2025 या स्पर्धाचे दुसरे वर्ष असून महिलांनी प्रत्येक राऊंड चा आनंद घेतला.

प्रमुख पाहुण्या कल्पनाताई शिंगाडे, सौ विजयाताई बनसोडे, सौ नीलिमा ताई कुलकर्णी, सौ राजेश्वरी ताई केदार तसेच परीक्षक या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.सौ नेहा कांबळे – वाव्हळ यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. मंचाच्या अध्यक्षा सौ लता कांबळे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले तसेच स्पर्धेचे नियम आणि अटी सांगितल्या. सौ अश्विनी कांबळे यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला.

मंचाच्या संचालिका आणि सभासद यांच्या कलाविष्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्पर्धे एकूण चार राऊंडमध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यामधून टायटल चे तीन बक्षीस काढण्यात आली तसेच प्रमुख चार बक्षीस काढण्यात आली.

टायटल बक्षीस पुढील प्रमाणे

बेस्ट वेशभूषा हे टायटल बक्षीस सौ निशा दौंडे यांनी पटकावले. बेस्ट टॅलेंट सौ विनिता सूर्यवंशी यांना मिळाले. बेस्ट व्यक्तिमत्व सौ प्रियंका चव्हाण यांना देण्यात आला. यांचे बक्षीस स्वरूप गिफ्ट हॅम्पर आणि ट्रॉफी स्वरूपात होते. सौ रूपालीताई दिवटे तसेच सौ रजनीताई भोसले. लक्ष्मी देवी विद्यालय, सोनंद. यांनी स्पॉन्सर केले होते. त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस देण्यात आली.

तसेच थर्ड रनरअप सौ स्मिता चव्हाण रोख रक्कम 1001/ सन्मान चिन्ह, सेकंड रनरअप सौ ऋतुजा गायकवाड रोख रक्कम 2001/सन्मान चिन्ह, फर्स्ट रनरअप सौ विनिता सूर्यवंशी रोख रक्कम 3001/सन्मानचिन्ह, मिसेस सांगोला 2025 विनर सौ मेघा चौगुले यांनी पटकावला. रोख रक्कम 5001/ सन्मानचिन्ह आणि क्राऊन. तसेच स्पर्धकांना गिफ्ट हॅम्पर देण्यात आले.

वरील अनुक्रमे बक्षिस स्पॉन्सर करण्यात आली होती. सविता ताई टकले, विजय लक्ष्मी पतसंस्था. श्री विजय राऊत, सुलोचना सपाटे. स्वरा फोटोग्राफी, माणगंगा उद्योग समूह. श्री नितीन इंगवले, तसेच क्राऊन पियुष एजन्सी, यांच्याकडून, संजय आदिवासी हर्बल हेअर ऑइल यांच्याकडून स्पर्धकांना गिफ्ट हॅम्पर तसेच सन्मान चिन्ह सौ रजनीताई भोसले लक्ष्मी देवी विद्यालय, सोनंद. सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

सौ रश्मी कौलवार, कु कार्तिकी वाव्हळ , सौ वैशाली काशीद यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

मनोरतन कलेक्शन यांच्यातर्फे लकी ड्रॉ चे 10 बक्षीस देण्यात आली. तसेच सौ रेणुका राऊत पाटील. प्रगती मेकओवर यांच्याकडून 1001/बक्षीस देण्यात आले. तसेच कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या सर्व महिलांना पियुष एजन्सी मार्फत मालास फुड्स श्री मोहन यादव व यशोधन इंटरप्राईजेस मार्फत सॅनिटरी पॅडचे श्री सुधीर खाडे यांनी फ्री संपलींग केले. विमलताई कुमठेकर कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी कु रिया कुमठेकर ,कु पूर्वा दौंडे यांच्या नृत्याविष्कारने कार्यक्रमाचे रंगत वाढवली. स्वागत रंगोली सौ पूनम कांबळे, सौ रुपाली कांबळे यांनी रेखाटली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पल्लवीताई थोरात यांनी केले. साऊंड सिस्टिम श्री तेजस बोत्रे, फोटो, व्हिडिओ शूट स्वरा फोटोग्राफर श्री ओंकार सपाटे यांनी केले. मंचाचे सर्व पदाधिकारी आणि संचालिका कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रम घेतले.

स्पर्धा वेगळी असल्यामुळे महिलांमध्ये वेगळा उत्साह होता. श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी महिला मंचाच्या वतीने वेगवेगळे स्पर्धा महिलांसाठी राबवले जातात. त्या पूर्णपणे वेगळ्या असतात त्यामुळे सर्व स्तरातून मंचाचे कौतुक होत असते. तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रमुख पाहुण्यांनी, परीक्षक आणि स्पर्धक यांनी मनोगत व्यक्त करून मंचाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंचाचा उपाध्यक्ष सौ स्नेहा कुमठेकर, सचिव सौ सीमा कांबळे, खजिनदार सौ तनुजा दौंडे तसेच सर्व संचालकांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

सौ अश्विनी दौंडे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचे सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button