सांगोला महाविद्यालय आयोजित आर्ट ऑफ लिविंग – हॅपीनेस कोर्समुळे विद्यार्थ्यांचे जीवन तणावमुक्त होणार — सौ संस्कृतीताई रामभाऊ सातपुते

सांगोला/प्रतिनिधी : येथील सांगोला महाविदयालयातील संगणक विभागाने विद्यार्थ्यांसाठी आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या सहकार्याने हॅपीनेस कोर्स दि 21/02/2024 ते 25/02/2024 या कालावधीत आयोजित केला होता. या कोर्सचे उदघाटन मा.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले व विद्यार्थ्यांनी योगा प्राणायम करून शरीर संपत्ती जपावी असे आवाहन केले.
सदरच्या कोर्स मध्ये योगा, प्राणायाम, सुदर्शन क्रिया, तणावमुक्ती, आनंदी जीवन याबाबत प्रशिक्षक श्री. अविनाश भैय्या कुलकर्णी, श्री राजू भैय्या वाघमारे यांनी प्रशिक्षण दिले. हॅपीनेस कोर्सचा सांगता समारंभ आर्ट ऑफ लिविंग टीचर सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांचे उपस्थितीत झाला. सांगोला महाविद्यालयाच्या संगणक विभागाने आयोजित केलेल्या आर्ट ऑफ लिविंग – हॅपीनेस कोर्समुळे विद्यार्थ्यांचे जीवन तणावमुक्त होणार असल्याचे प्रमुख पाहुणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच आनंदी जीवन जगणेसाठी दररोज व्यायाम करावा, मेडिटेशन करावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कोर्स यशस्वी पणे पार पाडण्यासाठी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार ताठे यांचे मार्गदर्शनाखाली प्रा. सदाशिव शिंदे, प्रा गजानन भोसले, प्रा दयानंद जंदळे, प्रा सुशांत शिंदे, प्रा धनंजय डंबाळ, प्रा. महेश बडवे, प्रा सौ. गोपलकार, प्रा. गणेश पैलवान, प्रा. सुरज पाटील, प्रा. उदय पाटील, श्री. राहुल ढोले, सर्व टिचिंग नॉन टिचिंग स्टाफ, विध्यार्थी विध्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
कोर्स केल्यामुळे आमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संगणक विभाग विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे संस्था पदाधिकारी, पालक वर्ग यांनी समाधान व्यक्त केले आहे.