सांगोला तालुकाक्राईम

सर्प दंशाने अचकदाणी येथे 1 जणांचा दुर्दैवी अंत

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील अचकदाणी येथे सर्प दंशाने 43 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला.शिवाजी भानुदास खरात वय 43 वर्षे, रा. अचकदाणी ता. सांगोला असे मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माणिक खरात यांनी फिर्याद दिली.
शिवाजी खरात हे रात्री 9 वाजता जेवण करुन घराच्या पुढे ओढ्यावर झोपले होते. पहाटे जनावरांची घाण काढण्यासाठी उठले कसे नाहीत त्यावेळी त्यांना जागी करत असताना त्यांचे तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांचे कपडे बाजुला केले असता त्यामध्ये घोणस जातीचा साप त्यांचे पायाजवळ बसलेला दिसला. यावेळी त्यांचे उजवे पायाचे अंगठ्याजवळ चावलेला दिसला. त्यानंतर लगेचच खाजगी गाडीतून ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे उपचाराकरीता दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन शिवाजी खरात हे उपचारास दाखल करण्यापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!