सांगोला महाविद्यालयात भरडधान्य पाककृती कार्यशाळा संपन्न

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वनस्पतीशास्त्र विभाग, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 1/3/2024 रोजी भरडधान्य पाककृती या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेस भरडधान्यापासून आपणास लागणारी पोषक घटक मिळत असतात पण आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे ती मिळणे दुरावस्त झाली आहेत. ते पोषक घटक भरून काढण्यासाठी भरड धान्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. पण भरडधान्य सहजा सहजी खाल्ली जात नाहीत म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या पाककृतीतून आहारात वापरली जावीत व 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य असल्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पाककृती तज्ञ सौ. लता कांबळे या उपस्थित होत्या. त्यांनी भगरीपासून ढोकळा, नाचणीचे पौष्टिक लाडू व नाचणी पिठापासून आंबील, ज्वारी भिजवून त्याची भेळ कशी बनवावी अशा प्रकारे त्यांनी कशा पाककृती बनवत व त्यांचे पौष्टिक महत्व् सांगत पाककृती करून दाखवल्या.
सदर कार्यशाळेचे प्रस्ताविक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. राम पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी भूषविले. डॉ सीमा गायकवाड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. रमेश टेंभुर्णे यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यशाळेस महाविद्यालयातील शास्त्र शाखेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथील वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर प्रा. रोहित पवार, प्रा. मारुती हाके, प्रा.डॉ. चित्रा जांभळे, कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे आदी कार्यशाळेस उपस्थित होते.