*सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजला आय. एस. ओ. मानांकन

सांगोला ( प्रतिनिधी ) संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांचे विचार प्रमाण मानून शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व रचनात्मक विकासासाठी नेहमी तत्पर असणारी सांगोला तालुक्यातील पहिली नामांकित अग्रगण्य व आदर्श शैक्षणिक संस्था व माध्यमिक शाळा अशी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या संस्थेची व संस्थेच्या संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजची ओळख आहे.यानुसार सुरू असलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीसाठी प्रथमच सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा आय.एस.ओ.मानांकनाने गौरव झाला आहे.
यानुसार ३ मार्च संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेस प्राप्त झालेल्या आय.एस.ओ.मानांकन नूतनीकरण प्रमाणपत्राचे अनावरण संस्था कार्यकारिणी सदस्य शीला झपके यांच्या हस्ते झाले.
यावेळी संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, संस्था सदस्य उपस्थित होते.तसेच संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सांगोला विद्यामंदिर सांगोलासाठी प्रथमच मिळालेले आय.एस.ओ.मानांकन प्रमाणपत्र प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार बिभिषण माने यांना प्रदान करण्यात आले.यावळी विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय अधिकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
आय.एस.ओ.इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन 21001: 2018 ही आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आहे. यानुसार सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, पालक यांच्यासाठीचे अमोघ कार्य, नेतृत्व, काहीतरी वेगळे, इतरांपेक्षा चांगले कार्य,नेहमीची तत्परता, सकारात्मक निर्णय क्षमता ,सतत सुधारणा यासाठीचे पद्धतशीर प्रयत्न यासंदर्भातील उल्लेखनीय कार्यांचे निरीक्षण करून सदर आय. एस.ओ.मानांकन प्राप्त झाले आहे.
यासंदर्भातील मानांकन प्रक्रिया पूर्ततेसाठी प्रशालेचे नरेंद्र होनराव यांनी विशेष योगदान दिले. व हे यश संपादन झाले.
यासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..