रविंद्र कांबळे यांचा मा.आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांचे हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश

सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे रविंद्र कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये माजी आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटील यांचे हस्ते सांगोला येथे प्रवेश केला.
रविंद्र कांबळे यांचेकडे उत्कृष्ट संघटन कौशल्य असून त्यांनी यापूर्वी कॉंग्रेस मध्ये सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. काँग्रेस पक्षामध्ये असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये डिजिटल नोंदणी, पक्षाचे विविध आंदोलन, मेळावे यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी उल्लेखनीय काम केले होते. तसेच सातत्याने सामाजिक चळवळीमध्ये जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत.
यावेळी जिल्हाअध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटीलम्हणाले, रविंद्र कांबळे यांनी पक्ष संघटन वाढविण्यास साठी प्रयत्न करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा असे मत व्यक्त केले.
यावेळी रवींद्र कांबळे यांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणार असून राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगोला शहर अध्यक्ष तानाजी काका पाटील, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड. महादेव कांबळे, राजुरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुभाष काटे, मांजरी ग्रामपंचायत सरपंच सचिन भुसे,माजी सरपंच मांजरी अशोक शिनगारे, गजानन काळे, सुखदेव जांगळे, अनिल पारसे, भारत काटे, समाधान जावीर , रोहित पवार, पत्रकार दादासो इंगोले ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र कांबळे यांचे या सर्व पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो ;