*ॲड. शिवप्रसाद बोराडे यांची मुंबई महापालिकेत कायदा अधिकारी श्रेणी-1 पदी निवड

सांगोला येथील ॲड. शिवप्रसाद धर्मराज बोराडे यांची मुंबई महापालिकेत नुकतीच कायदा अधिकारी श्रेणी-1 पदी निवड झालेली आहे.
मुंबई महापालिकेतर्फे डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या निवड परीक्षेत त्यांनी हे यश संपादन केलेले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यालय तर माध्यमिकपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला येथुन तसेच एलएलबी व एलएलएम चे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून प्रथम श्रेणीत झालेले आहे. त्यांनी विधी क्षेत्रातील सेट व नेट परीक्षेतही यश मिळवलेले आहे.
सध्या ते सांगोला येथील कोर्टात वकिली करत आहेत. ते महात्मा फुले बीएड कॉलेजचे अध्यक्ष धर्मराज बोराडे यांचे चिरंजीव तर डॉ. प्रमोद बोराडे यांचे धाकटे बंधू आहेत त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे..