भाई.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकापचा सोमवारी भव्य शेतकरी मेळावा

सांगोला (प्रतिनिधी):- सोमवार दि.11 मार्च रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य शेतकरी मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. सदर मेळाव्यास भाई जयंत पाटील, आमदार रोहित पवार व श्री .प्रवीण गायकवाड उपस्थित राहणार असून शेकाप कार्यकर्त्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेकाप नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
सोमवार दि.11 मार्च रोजी होणार्या शेतकरी मेळाव्यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काल गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी सांगोला सुत गिरणी येथे बैठक संपन्न झाली.यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते. बैठकीचे अध्यक्षस्थान मारुतीआबा बनकर यांनी भूषविले.
पुढे बोलताना शेकाप नेते डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, स्व.आबासाहेबांनी 55 वर्षे समाजकारण केले. जनतेमुळे ती संधी स्व.आबासाहेब यांना मिळाली. मला आबासाहेब यांचा लाल बावटा महत्वाचे आहे.त्यासाठी पक्ष संघटना महत्वाची आहे. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे.त्यामुळे आपण एक मताने इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहायचे आहे. विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे.त्यामुळे त्रास दिला जात आहे. त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नका.असे सांगत सोमवारच्या मेळाव्यास कार्यकर्त्यार्नी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
यावेळी चिटणीस दादासाहेब बाबर,डॉ.प्रभाकर माळी, मारुती लवटे, शंकर चौगुले, सुनील चौगुले, महेश बंडगर, किशोर बनसोडे, नंदकुमार शिंदे, प्रदीप मिसाळ, शिवाजी व्हनमाने, माजी कृषी अधिकारी हराळे, नंदकुमार शिंदे, मारुती ढाळे, कल्पनाताई शिंगाडे, गजेंद्र कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीस इंजि.मधुकर कांबळे, सुरेश माळी, इंजि.रमेश जाधव, समाधान पाटील, अॅड.नितीन गव्हाणे, अरुण पाटील, बाळासाहेब पाटील, अंकुश येडगे, मनोज ढोबळे, गिरीश गंगथडे, विष्णू देशमुख, अवधूत कुमठेकर, अॅड.भारत बनकर, बबनराव जानकर, नारायण जगताप, रफिक तांबोळी, परमेश्वर कोळेकर, समाधान नागणे, शिवाजी शेजाळ, किरण पवार, दत्ता टापरे, मारुती सरगर यांच्यासह शेतकरी कामगार पक्षासह पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विविध गावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक विनायक कुलकर्णी, सूत्रसंचालन उल्हास धायगुडे, स्वागत प्रा.नवनाथ बंडगर, यांनी तर आभार डॉ.प्रभाकर माळी यांनी मानले.