कालवा आउट लेट उघडून विनापरवाना तलावात पाणी सोडले; 23 जणांविरुध्द गुन्हा दाखल

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला कालवा नंबर 12/700 किमी आउट लेटे जेसीबी च्या साहयाने उघडून तलावात पाणी सोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी 23 जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची फिर्याद जुनोनी पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी महेश पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 21 फेब्रुवारी 2024 रोजी धानंद तलाव आटपाडी येथून सांगोला तालुक्यात शेतकर्यासाठी शेतीला पाणी सोडलेले होते, तेव्हा पासून पाटबंधारेद्वारे शेतकर्याला नियमा प्रमाणे पाणी देणे चालू होते. दि.08 मार्च 2024 रोजी सकाळी 11/30 वाजता सांगोला कालवा साखळी नंबर 12/700 किमी तिप्पेहळळी ठिकाणा पासून पुढे कालव्याच्या शेवट्या भागात मौजे कडलास, बुरंगेवाडी, वाटंबरे, व राजुरी या भागात पाणी चालू होते. तसेच साखळी क्र. 12/700 कि.मी या ठिकाणी पाहणी करीता आटपाडी पाटबंधारे विभाग येथील कर्मचारी बाळासाहेब जाधव यांना अतिरीक्त कामाकाजा करीता नेमणूक केलेली होती. बाळासाहेब जाधव यांनी फिर्यादी महेश पाटील यांना सकाळी 11/30 वाजता फोन करुन कळविले की, 20 ते 25 लोक सहा ते सात मोटार सायकल वरती आले, काही लोक चार चाकी वाहनातून आहेत व त्या लोकांसोबत एक जेसीबीचे सहयाने कॅनॉलचे आउट लेट उघडून पाणी सोडून दिलेले आहे असे कळविले होते.
त्यावेळी फिर्यादी सह उपविभागीय अभियंता गायकवाड , कालवा निरीक्षक संभाजी होवाळ आदी सर्वजण त्या ठिकाणी पाहीले असता त्या ठिकाणी आउट लेट उघडून दुसरी कडे ओढ्यामार्फत जुनोनी तलावा मध्ये पाणी सोडलेले दिसले होते. सदर कालव्याचे पाणी कोणी विनापरवाना सोडले या बाबत माहीती विचारले असता 23 जणांनी विनापरवाना सांगोला कालवा नंबर 12/700 किमी आउट लेट हा जेसीबी च्या साहयाने उघडून तलावात पाणी सोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.