तानाजी गायकवाड यांचे दुःखद निधन

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरातील वाढेगाव रोड येथील तानाजी कृष्णा गायकवाड यांचे मंगळवार दि.२० जून रोजी राहत्या घरी सकाळी ९ च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.सांगोला दुय्यम निबंधक कार्यालय येथील संगणक ऑपरेटर सतिश गायकवाड यांचे ते वडील होते.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,तीन मुले,एक मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा तिसऱ्या दिवशीचा विधी गुरुवार दि.२२ जून रोजी सकाळी ७:३० वाजता सांगोला स्मशानभूमी,वाढेगाव नाका येथे असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी कळविले आहे.