जवळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना टॅबचे वाटप

जि. प.प्रा. मुलांची शाळा नं .1 जवळे ता. सांगोला या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांना आज शनिवार दिनांक 13/07/2024 रोजी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री तानाजी साळे साहेब यांचे शुभ हस्ते व उपस्थित पालकांचे शुभ हस्ते वीस मुलांना टॅबचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले.
जि प च्या शाळेतील मुलांना संगणकाचे ज्ञान व्हावे त्यांना टॅब वर शालेय अभ्यासक्रम वाचता यावा लिहिता यावा संगणकीय ज्ञान मिळावे या हेतूने मुलांना टॅबचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री रामहरी विठ्ठल सावंत (ग्रामीण साहित्यिक), शाळेतील शिक्षिका श्रीमती कीर्तीलता काळे, श्रीमती कावेरी क्षीरसागर, संगणक तज्ज्ञ शिक्षक श्री कैलास मडके,मुलांचे शिक्षण प्रेमी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक माजी आमदार श्री.दीपक आबा साळुंखे पाटील, जवळे गावच्या सरपंच सौ. सुषमाताई घुले, उपसरपंच श्री.नवाज खलिफा शिक्षण विस्तार अधिकारी श्री भंडारी साहेब, सांगोल्याचे गटशिक्षण अधिकारी श्री.सुयोग नवले साहेब,यांनी केले मुलांना टॅबचे वाटप केल्याने विद्यार्थी व पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.