सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

सध्याचे सरकार पुन्हा आले तर संविधान व लोकशाही जिवंत राहणार नाही- आ.रोहितदादा पवार

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना व महाविकास आघाडी यांच्या वतीने सांगोला येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- मी महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून आहे .त्याचप्रमाणे युवावर्ग, शेतकरी, कष्टकर्‍यांसाठी लढतोय म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनता सोबत आहे त्यामुळे काय कारवाई करायची ती करा मी कारवाईला घाबरणार नाही. युवकांसाठी असणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. महाराष्ट्राचा शेतकरी अडचणीत असताना देखील आज कृषी मंत्री दिसून येत नाहीत ही बाब गंभीर असून सध्याच्या सरकारला कुटुंब, संघटना फोडण्यासाठी वेळ असून सर्वसामान्यांसाठी वेळ नाही. सध्याचे सरकार पुन्हा आले तर संविधान व लोकशाही जिवंत राहणार नाही.अशी भिती आम.रोहितदादा पवार यांनी व्यक्त केली.

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना व महाविकास आघाडी यांच्या वतीने सांगोला येथे सोमवार दि.11 मार्च रोजी भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्या प्रसंगी आमदार रोहितदादा पवार बोलत होते. व्यासपीठावर श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख, शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राजू कोरडे, डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, पंढरपूरचे अभिजीतआबा पाटील, राष्ट्रवादीचे बाबुराव गायकवाड, भरत अण्णा शेळके, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, सूर्यकांत घाडगे, अरविंद पाटील, नवनाथ पाटील,काँग्रेसचे अभिषेक कांबळे, तोहीद मुल्ला यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार रोहितदादा पवार म्हणाले की, भाजपला कुणाचेही घेणे देणे पडले नसून फक्त स्वतःचे हित पडले आहे.येणार्‍या लोकसभा निवडणुकीत दबावतंत्र वापरण्यात येणार आहे. यासाठी आपणा सर्वांना एकजुटीने लढावयाचे आहे. सरकारकडून फक्त जाहिरातींवर खर्च करण्यात येत असून फुटून गेलेले आमदार उद्या आमदार नसणार आहेत.येणार्‍या सर्व निवडणुकामध्ये स्वाभिमानी महाराष्ट्र राज्यांमध्ये आपल्या विचाराचे सरकार आणा असेही आवाहन सुध्दा शेवटी त्यांनी केले.

शेकाप चिटणीस भाई.जयंत पाटील म्हणाले, शरदराव पवार व उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता खंबीरपणे उभी आहे देशामध्ये इंडिया आघाडी भक्कम असून आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. राजकारण करायचे असेल तर या पुढील काळात मोदी राजवट ंयेता कामा नये, लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही राजू शेट्टी आणि माढा अशा दोन जागा मागितलेल्या आहेत. सद्य परिस्थितीत इंडिया आघाडी भक्कम स्थितीत असून इंडिया आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. डॉ.बाबासाहेब व डॉक्टर अनिकेत ही आबासाहेबांच्या रक्तातील असून हे दोघेही वेडेवाकडे पाऊल उचलणार नाहीत असा माझा पूर्ण विश्वास आहे येणार्‍या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्य असणारा सांगोला मतदार संघाचा विजय असेल अशी खात्री शेवटी त्यांनी दिली.

यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, सुरजदादा बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. प्रास्तविक विनायक कुलकर्णी यांनी केले.

विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षात एकदाच एक डायलॉग दिला… बाकी काय केले नाही, काय वातावरण, काय लोक, काय लोकांचे प्रेम, काय इथला स्वाभिमान हे बघण्यासाठी आम्ही इथे येतोय तर काही लोक झाडे बघण्यासाठी दुसर्‍या राज्यात जातात अशी टीका विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्यावर करत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनी देशमुख कुटुंबियांसोबत प्रामाणिक राहावे.
आ.रोहितदादा पवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!