सांगोला तालुकामहाराष्ट्र

शरद पवार साहेबांनी महिलांना समानतेचे धोरण दिले नसते तर; मी आज तुमच्या समोर उभी राहिली नसते; म्हणून मी पवार साहेबांच्या बरोबर.- जयमाला गायकवाड 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे चिन्ह तुतारी हे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घराघरात जाऊ देत - ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड

सांगोला प्रतिनिधी :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र त्याचबरोबर देशामध्ये मोठ्या अस्थिरतेचे वातावरण तयार झालेले आहे. यामध्ये भाजप पक्षाने कूटनीतीचा अवलंब करून महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता त्यांच्या या कूटनेतील बळी पडली नाही. दिल्लीच्या तक्ताला पूर्वी पण महाराष्ट्र जड गेला होता. आणि आत्ताही आपले सर्वांचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व उद्धवजी ठाकरे साहेब हे जड चाललेले आहेत, म्हणून त्यांनी या दोघांची ताकद संपवण्यासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पक्ष फोडला.  ज्यावेळेस मला तुमची बाजू कोणती असे विचारण्यात आलं त्यावेळेस मी दीपक आबा व बाबुराव भाऊ यांना सांगून मी सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली.     शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर राहण्याचं ठरवलं. देशामध्ये लोकशाही मला माझं निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे आणि हेच स्वातंत्र्य मला घटनेने दिलेला आहे त्याचबरोबर पवार साहेबांनी राजकारणामध्ये महिलांना वाटा दिला नसता तर आजपर्यंत आज मी तुमच्यापुढे उभारले नसते.
आज आपण सर्वजण या मेळाव्याला येण्याचे कारण की येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेची इलेक्शन लागणार आहेत लोकसभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व काँग्रेस ,शेतकरी कामगार पक्ष या सर्वांचा मिळून एक उमेदवार आपल्या देण्यात येईल त्या उमेदवाराचा आपण सर्वांनी एकनिष्ठतेने व मोठ्या प्रामाणिकपणे आपल्याला त्यांची प्रचार करायचा आहे व त्यांच्या हात बळकट करायचे आहेत त्याचबरोबर केंद्रातील सरकार बरोबर लढण्यासाठी पवार साहेब व  उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करायचे आहेत. आपल्या पक्षाची सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून व बळीराम काका साठे व बाबुरावजी  गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील तुम्हाला कुठलीही अडचणी आली, कधीही मला फोन करा, मी तुमचे काम करण्यास बांधील आहे. परंतु हे करत असताना तुमच्या सर्वांची साथ असणे फार महत्त्वाचे आहे आज आपण इथे आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी जमलेलो आहे त्यासाठी आपण स्वखुशीने तन मन अर्पण आपल्याला आपल्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला ताकद द्यायची आहे हे करीत असताना भविष्यामध्ये विधानसभा, पंचायत समिती,  जिल्हा परिषद, नगरपालिका ,ग्रामपंचायत या स्तरावर आपल्या सर्वांना काम करायचं आहे त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे कोणती मनात किंतु परंतु न ठेवता आमच्याबरोबर तुम्ही येऊन सांगोला तालुक्यामध्ये आपली पूर्वीप्रमाणे राष्ट्रवादी जशी होती त्या पद्धतीने आपण आणण्याचा प्रयत्न करू व पवार साहेबांचे हात बळकट करू असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमाला ताई गायकवाड यांनी सांगितले.
                राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा बुधवार दिनांक १३ मार्च रोजी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड बोलत होते. ते म्हणाले लोकांमध्ये आगामी निवडणुका विषयी संभ्रम आहे. सर्वसामान्य जनता व मतदार शरद पवार साहेब यांचे  बरोबर आहे . शरद पवार लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीकडून जे उमेदवार देतील त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्हा परिषद गटवाईज पदाधिकारी नेमून, कमिट्या करून पक्षाच्या कामाला लागले पाहिजे .सर्वसामान्य जनता व मतदार भारतीय जनता पक्षावर नाराज आहे. शरद पवार यांनी महिलांना सत्तेमध्ये वाटा दिला . त्यामुळे महिला आज सर्वच क्षेत्रात सक्षमपणे उभ्या राहिल्या . लोकसभा निवडणुकीत माढ्याचा खासदार हा महाविकास आघाडीचा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करूया. जिल्ह्यात ,राज्यात व देशात शरद पवारांच्या विचारांचे सरकार आणण्यासाठी आपले मत परिवर्तन करून लोकशाही टिकवली पाहिजे. हुकूमशाहीला दूर ठेवण्यासाठी व सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने प्रयत्न करूया असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांनी सांगोला येथे व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप म्हणाले, शिव, शाहू ,फुले, आंबेडकर यांचा विचार पुढे आणूया. भाजप सरकार देशातील लोकशाही संपवू पाहत आहे. सर्वसामान्य जनतेचा  भ्रमनिरास होत असून जनतेच्या हाती काहीच उरले नाही .न्यायव्यवस्था कमकुवत झाली आहे. लोकशाही संपुष्टात येत असून हुकूमशाही अस्तित्वात येत आहे. आपले भविष्य अंधारात आहे. भाजपचे सरकार घालवायचे असेल तर शरद पवार यांच्या विचाराने चालले पाहिजे. महाराष्ट्रातले अनेक उद्योग- व्यवसाय गुजरातला गेले. महाराष्ट्रातल्या अन्यायाला वाचा फोडणारा पक्ष व नेतृत्व हे शरद पवारांकडे असल्याने त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून साथ देऊया.
                   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे म्हणाले, भाजप सरकारने उद्योजकांचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. शरद पवार सत्तेत असताना त्यांनी शेतकऱ्यांचे 72 हजार कोटी कर्ज माफ केले होते. आगामी निवडणुका या आपल्या अस्तित्वाच्या आहेत .लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदारांना मतपेटीपर्यंत नेले पाहिजे.राज्यातील सध्याच्या सरकारने शिवसेना राष्ट्रवादीत फूट पाडली. काही नेते मंडळींनी नैतिक पातळी हरवली आहे. . जनमताचा आदर करीत शरद पवार निर्णय घेत असतात .भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांच्या विचाराशी बांधील राहून महाविकास आघाडीला साथ दिली पाहिजे.येत्या  लोकसभा निवडणुकीच्या अनुसंघाने कार्यकर्ता मेळावा घेतला आहे. मतदान कोणत्या पक्षाला करायचे हा निर्णय आपण ठामपणे घेतला पाहिजे. मागील दोन  लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपचे सरकार बहुमतात आल्याने अनेक घडामोडी झाल्या .आता 2024 च्या निवडणुकीत भाजपला सत्ता दिली तर देशात हुकूमशाही अस्तित्वात येईल. जनता भयभीत व्हावी असे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे .राज्यात भाजपने उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली तर शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. फोडाफोडीचे राजकारण करून  सत्तेपासून दूर ठेवले. कायद्याची कलमे बदलली असुन याचा गंभीरपूर्वक विचार करून भाजपला सत्तेपासून रोखले पाहिजे .सत्ता परिवर्तनासाठी जनतेची साथ हवी आहे. आगामी अनेक प्रकारची संकटे दूर करण्यासाठी भाजपला लोकसभा निवडणुकीत दूर ठेवले पाहिजे.
यावेळी माजी आमदार डॉ.राम साळे म्हणाले ,शिवसेना राष्ट्रवादीत फूट पाडत काही नेते मंडळींनी राजकीय परिस्थिती अस्थिर केली. येत्या महिन्याभरात लोकसभा निवडणुका होणार असून शरद पवार जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मतदारांनी जागृत झाले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांना तुतारी चिन्ह मिळाले आहे.
यावेळी  सोलापूर जिल्हा प्रवक्ते महेश माने, महिला जिल्हाध्यक्षा  सुवर्णाताई शिवपुरे ,बाळासाहेब पाटील, यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी साहेबराव ढेकळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, युवक तालुका अध्यक्ष शशिकांत गव्हाणे, शहराध्यक्ष बाबुराव खंदारे ,शहर युवक अध्यक्ष मोहसीन तांबोळी, महादेव गायकवाड ,डॉ वैभव जांगळे, डॉ यशोदीप गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ धनंजय पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!