समाजकल्याण विभागाकडून मतदारसंघातील ५५ विकास कामांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी सिमेंट रस्ता करणे, पेव्हींग ब्लॉक बसवणे, पाणीपुरवठ्याची सोय करणे, पाण्याची टाकी व बोअर, समाजमंदिर, स्ट्रीटलाईट, बंदिस्त गटार, सिडी वर्क अशी कामे करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील ४८ गावांतील ५५ कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
संगेवाडी येथील कांबळे, वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे ५ लाख, चिकमहुद येथील एकता नगरमध्ये सिमेंट रस्ता करणे १० लाख, तळेवाडी उबाळे वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे १० लाख, अकोला येथील गेजगे वस्ती येथे पाणीपुरवठा सोय करणे ५ लाख, खवासपूर येथील ऐवळे वस्तीवर पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लाख, जुजारपुर येथील
गावठाणमध्ये सिमेंट रस्ता करणे ५ लाख, राजूरी येथील
भिमनगरमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, मेथवडे येथील आंबेडकरनगरमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, ह.मंगेवाडी येथील कांबळे खांडेकर वस्तीवर पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, वाटंबरे येथील वाढीव गावठाणात पेव्हींग ब्लॉक बसवणे ७ लाख, एखतपूर येथील आण्णाभाऊ साठे नगरमध्ये समाज मंदिर बांधणे ७ लाख, महूद येथील कांबळे वस्तीवर काँक्रिट रस्ता करणे १० लाख, मांजरी येथील कांबळे वस्ती-पवारवाडीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, उबाळे रणदिवे वस्तीमध्ये काँक्रिट रस्ता करणे ५ लाख, लोटेवाडी येथील सावंतवस्तीवर विद्युतीकरण स्ट्रीटलाईट ५ लाख, जावीर देवकुळे वस्तीवर विद्युतीकरण स्ट्रीटलाईट ५ लाख, शिवणे येथील बेघर वस्तीमध्ये बंदिस्त गटार करणे ५ लाख, कटफळ येथील धनवडे हातेकर वस्तीवर रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख, बामणी येथील
शेळके वस्तीवर काँक्रिट रस्ता करणे ४ लाख, पारे येथील
गावठाणात बंदिस्त गटार करणे ५ लाख, चोपडी येथील आण्णाभाऊ साठेनगरमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, केंगार वस्तीवर सिडी वर्क ५ लाख, बलवडी येथील दलितवस्ती नाझरे रोड येथे पेव्हींग ब्लॉक बसवणे ४ लाख,
डोंगरगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, हातीद येथील भंडगे वस्तीवर समाजमंदिर बांधणे ७ लाख, नाझरे येथील रणदिवे वस्तीवर रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख, पाचेगांव बु. येथील भोसले वस्तीवर विद्युतीकरण स्ट्रीटलाईट ४ लाख,
शिवणे येथील भिमनगरमध्ये स्ट्रीटलाईट २ लाख, लोणविरे येथील आणाभाऊ साठेनगर मध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे ४ लाख, चिणके येथील काटे वस्तीवर काँक्रिट रस्ता करणे ५ लाख, धायटी येथील शिंदे किर्तके वस्तीवर पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, कडलास येथील ठोकळे वस्तीवर पेव्हींग ब्लॉक बसवणे १० लाख, कोळे येथील शंकर मोरे वस्तीवर रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लाख, मेडशिंगी येथील सुतार वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लाख, पाचेगाव खु. भडंगे वस्ती काँक्रीट रस्ता करणे ५ लाख, सोनंद येथील रमाई नगरमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, अजनाळे येथील भडंगे वस्ती नवीन वसाहतीत पेव्हींग ब्लॉक बसवणे ६ लाख, तिप्पेगाळी येथील मोरे वस्ती पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, जुजारपूर येथील गावठाणात पेव्हींग ब्लॉक बसवणे ४ लाख, संगेवाडी येथील वाघमारे वस्तीवर पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, वासुद येथील संत रोहिदास नगरमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, जवळा येथील जुना राजवाडा पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, घेरडी येथील गावठाणात रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख रुपये अशा ४३ कामांसाठी २ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
तसेच मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील आण्णाभाऊ साठे नगरमध्ये भूमिगत गटार व काँक्रिट रस्ता करणे ४ लाख, रोहिदास नगरमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे ४ लाख, उपरी येथील आंबेडकर नगरमध्ये बंदिस्त गटार ४ लाख, शेळवे येथील आण्णाभाऊ साठे नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, गावठाणात काँक्रिट रस्ता करणे ५ लाख, पळशी येथील सिद्धार्थ नगरमध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लाख, जैनवाडी येथील रोहिदास नगरमध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लाख, सुपली येथील दत्त नगरमध्ये काँक्रिट रस्ता करणे ५ लाख, सोनके येथील गेजगे, केंगार, गायकवाड वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लाख, केसकरवाडी येथील चंदनशिवे गाडे वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ४ लाख, ढोबळे वस्ती येथे पेव्हींग ब्लॉक बसवणे ४ लाख, तिसंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे ५ लाख, गार्डी येथील रमाई नगरमध्ये पाणीपुरवठा सोय करणे, पाण्याची टाकी व बोअर घेणे ३ लाख रुपये अशी ५६ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.