फुले फार्म हाऊस मध्ये ज्येष्ठांची अंगत-पंगत

सांगोला – शाकाहारी बेत सगळ्यात भारी,याची प्रचिती सांगोल्यात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी नुकतीच घेतली.निमित्त होते,फुले फार्म हाऊसच्या भेटीचे. सांगोल्यातील उद्योजक व नॅशनल टाईपींग कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट व अभ्यासिका केंद्राचे संचालक रमेश फुले सर यांच्या गोडसे वाडी येथील फार्म हाऊसला वर्गमित्रनी नुकतीच भेट दिली.
फुलें यांच्या शेतातील आंब्याच्या बागेची पाहणी केली.त्याच प्रमाणे केळी,पेरू,शेवगा,हादगा ,नारळ,मलबार निम बागेची पाहणी केली.गर्द आंबा व पेरूच्या झाडाखाली शाकाहारी सहभोजनचा आस्वाद घेतला.एकाची वांग्याची भाजी,दुसऱ्याचे धपाटे,तीसऱ्याची खमंग खिडकी,जोडीला घट्ट दही, गोड ताक, गाजर,काकडी,गोड लापशी अशा सात्विक भोजनाने जेवणाची लजजत वाढवली.जेवणानंतर सांगोला,संगोल्याचे राजकारण, समाजकारण, शेती, निसर्ग, मित्रमंडळी या विविध विषयावर गप्पा गोष्टी संस्मरणीय ठरल्या.
एस.एस. सी*75 अकरावी जुनी शेवटची बॅच चे वतीने सदर फार्म हाऊस भेटीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी रमेश फुले यांच्या विनंतीस मान देवून सेवानिवृत्त गट विकास अधिकारी सोपान माळी,मुद्रांक विक्रेंते खंडू कुलकर्णी, बाळासाहेब ताक भाते, प्रा.राजाभाऊ ठोंबरे,विलास पाटील आदि मित्रमंडळ उपस्थित होते