सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

नाझरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शेकापच्या मंदाकिनी सरगर यांची निवड

नाझरे प्रतिनिधी:- नाझरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शेकापच्या सौ मंदाकिनी अण्णा सो सरगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या अगोदरच्या सरपंच सौ स्वाती बनसोडे यांनी राजीनामा दिल्याने सरगर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जाधव, ग्रामविकास अधिकारी एम. व्ही. मिसाळ, तलाठी बाडीवाले यांनी काम पाहिले.
 सुरुवातीस आबासाहेब व तुकाराम काका यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नूतन सरपंच सौ मंदाकिनी सरगर, अण्णासो सरगर, संजय सरगर यांचा भव्य सत्कार पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते व जि.प. सदस्य दादासो बाबर, माजी उपसभापती सुनील चौगुले, सूतगिरणीच्या संचालिका सौ सीता देवी चौगुले, माजी प्राचार्य सुबराव बंडगर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
  सदर प्रसंगी युवा नेते उल्हास दादा धायगुडे, मार्केट कमिटीचे आबा सो आलदर, तानाजीराव मिसाळ, माजी सरपंच अशोक पाटील, विजयकुमार देशमुख, हनुमंत सरगर, शामराव आप्पा वाघमारे, गोपाळ सरगर, उत्तम पाटील, विजयकुमार बंडगर, सौ दिपाली देशमुख, सो स्वाती बनसोडे, राजू बंडगर, चंद्रकांत बंडगर, नामदेव बंडगर, तात्यासो बंडगर, सरपंच सौ विद्यादेवी वल्लेकर, दर्याबा बंडगर, बंडू भाऊसाहेब, संजय वलेकर, उपसरपंच मधुकर आलदर, शशिकांत पाटील, प्रणाम चौगुले, गणीसो काझी, शिवाजी सरगर, राम आप्पा ढोणे, वसंत कुटे, भाऊ चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सौ सुमित्रा लोहार, सौ सुवर्णा पाटील, सौ निर्मला ढोबळे, सो अर्चना सरगर, दिलीप बनसोडे, डॉक्टर विजय सरगर, नारायण पांढरे, चेअरमन अनिल बंडगर, राजेश अडसूळ, राजाभाऊ कोळेकर, मदन रायचूरे, बाळासो चौगुले, मच्छिंद्र सरगर, राजू खोकले, गोरख भाऊ आदाटे, सुनील अडसूळ, रामा लिंगे, बाळासाहेब बंडगर, बाळासाहेब वाघमारे, सागर वाघमारे, भारत वाघमारे, बाळू वाघमारे, नारायण कांबळे, श्रीमंत सरगर, ऍड दत्ता वाघमोडे, पर्यवेक्षक शहाजान मुलानी, शिक्षक शिवभूषण ढोबळे, दुर्योधन आलदर, नवनाथ बंडगर, काकासो पांढरे, माझी प्राचार्य टी. के. वाघमारे, राजू गड हिरे, मुकुंद पाटील सर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सोसायटी चेअरमन सुनील बनसोडे यांनी तर आभार माजी उपसरपंच प्रा. विजयकुमार गोडसे यांनी मानले.
आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाझरे गावाचे नाव सांगोला तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यात नावलौकिक करण्यात कै. वसंतराव अण्णा पाटील यांचा मोठा वाटा होता. व नूतन सरपंच मंदाकिनी सरगर यांनी तळागाळातील लोकांची सेवा करावी व शासनमान्य योजनेपासून त्यांना वंचित ठेवू नये व सरपंचाचे सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावे.
*-भाई डॉ बाबासाहेब देशमुख*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!