सावे माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

सावे माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री प्रकाश शेजाळ व सचिन कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्यानंतर या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत ऋतुजा वाघमारे, अस्मिता शेळके ,कल्याण माने, वनिता बंडगर, गौरी शेजाळ, पूनम बंडगर, अनिता बंडगर व सानिका शेळके इत्यादी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांना सांगितला
तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री अनुसे सर व नलवडे सर यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्यानंतर कार्यक्रमाचे औचित्य साधून घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला .प्रथम क्रमांक- कुमारी वनिता हरिदास बंडगर. द्वितीय क्रमांक- अस्मिता आनंदा शेळके तृतीय क्रमांक- कुमारी अनिता हरिदास बंडगर व सानिका किसन शेळके यांना विभागून देण्यात आला व त्यांचे अभिनंदन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर व प्रमुख पाहुणे म्हणून श्री शेंडगे सर उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयातील सहशिक्षक श्री मेटकरी सर यांनी केले.