रयत सेवक प्रमोद डोंबे यांचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडून अभिनंदन

सांगोला – सांगोला शहरातील उपक्रमशील शिक्षक प्रमोद अरविंद डोंबे यांना परीक्षा पे चर्चा या विषयावर मतप्रदर्शन केल्याबद्दल व चर्चेत सहभाग घेतल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन पर पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.या अगोदर सांगोला शहरातील अमित उत्तमराव घातूले या नवोदय विद्यालयातील शिक्षकास असेच शुभेच्छा व अभिनंदन पत्र प्राप्त झाले आहे.सांगोला शहरातील या दोन तरुण शिक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून अभिनंदन पत्र प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्रमोद डोंबे हे रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी तालुका सांगोला येथील प्रशालेत शिक्षक म्हणून सेवेत असून एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.प्रत्येक गोष्टीत झोकून देऊन मनापासून काम करण्यात त्यांना रस आहे.सांगोला शहरातील विविध उपक्रमात ते सातत्याने सहभाग घेऊन यश प्राप्त करतात.दर वर्षी गणेशोत्सव काळात सजावट स्पर्धेत ते सहभाग नोंदवतात.विविध व सामाजिक विषयावर देखावे सादर करून ते प्रेक्षकांची मने जिंकून घेतात.वृत्तपत्र लेखनात त्यांना रुची असून ते सांगोला शहरातील विविध दैनिकात सातत्याने लेखन करत असतात.त्यांच्या उपक्रमशीलता व शैक्षणिक कार्याची दखल घेवून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
नुकताच त्यांना सोलापूर येथील लोकमंगल प्रतिष्ठान चां आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.सन 2047 साली भारतीय स्वातंत्र्याचा शतक महोत्सव आहे.त्यावेळी भारताचा डंका संपूर्ण जगात पिटण्यासाठी तरुण पिढी अग्रेसर राहणार आहे.त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आजच्या शि क्षकाच्या पिढीचे योगदान मोलाचे ठरणार आहे.त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यात प्रमोद डोंबे यांचे सारख्या अनेक शिक्षकांनी चर्चेत सहभाग घेतला होता.प्रमोद डोंबे यांचा संपूर्ण परिवार शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून वडील अरविंद डोंबे हे देखील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत.
अमित घातुले यांचे प्रमाणे प्रमोद डोंबे याना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडून अभिनंदन पत्र प्राप्त झाल्याबद्दल संगोल्याच्या या दोन सुपुत्रवर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे प्रमोद डोंबे हे देखील नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी सांगली जिल्ह्यातून नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले होते.आता या नंतर कोणा भाग्यवंत शिक्षकास असेच शुभेच्छा पत्र मिळणार,या कडे सांगोल्यातील शिक्षण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.