सावे माध्यमिक विद्यालयात मतदार जनजागृती प्रभातफेरी संपन्न.

सावे माध्यमिक विद्यालयात दिनांक 21 मार्च रोजी मतदार जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी विविध घोषणा देऊन ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यालयातील सहशिक्षक श्री बर्गे सर यांनी मतदार जागृती विषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करून मतदान करण्याविषयीच्या घोषणा दिल्या. सदर घोषणा मध्ये मतदान हा आपला हक्क आहे, सर्वांनी मतदान करावे, मतदान पवित्र दान, मतदान हा आपला हक्क आहे, चला सर्वांनी मतदान करूया लोकशाहीचे रक्षण करूया असे संदेश देण्यात आले .
सदर प्रभात फेरीचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी केले तर सर्व प्रकारचे सहकार्य विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी ,पालक व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.