संगेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी समाधान होवाळ यांची बिनविरोध निवड

सांगोला, तालुका प्रतिनिधी : संगेवाडी (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी समाधान होवाळ यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय आधिकारी हरिश्चंद्र जाधव यांनी दिली.
येथील ग्रामपंचायतच्या सरपंच नंदादेवी वाघमारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदाची निवडणूक गुरुवार (ता. 21) रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. या ग्रामपंचायतीवर आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या आघाडीचे वर्चस्व आहे. आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी समाधान होवाळ यांचा एकच अर्ज आल्याने सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडीवेळी ग्रामसेवक विजय कांबळे, माजी सरपंच नंदादेवी वाघमारे, ग्रामपंचायत सदस्या दिपाली नष्टे, अनुराधा खंडागळे, रेश्मा खंडागळे यांच्यासह दामोदर वाघमारे, दामोदर पवार, प्रभाकर पवार, सूर्यकांत खंडागळे, महादेव कदम, विलास खंडागळे, शिवाजी होवाळ, सुभाष खंडागळे, धनंजय पवार, दीपक शिंदे, चंद्रशेखर वाघमारे, रविंद्र खंडागळे, संतोष खंडागळे, अशोक वाघमारे, किरण खंडागळे, सुधीर खंडागळे, अमोल वाघमारे, निसार मुलाणी इत्यादी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
समाधान होवाळ यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी नूतन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.