सांगोला तालुकामहाराष्ट्र

ऑॅल इंडिया धनगर समाज महासंघाच्या महासचिव पदी सांगोला येथील श्री. प्रशांत लवटे

सांगोला(प्रतिनिधी):-ऑॅल इंडिया धनगर समाज महासंघाच्या महासचिव पदी सांगोला येथील श्री. प्रशांत लवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी नुकतेच दिले आहे.

धनगर समाजाच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी आपण गेले अनेक वर्ष कार्यरत आहात. समाजाचे हित जोपासण्यासाठी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असता. धनगर समाजाचे संवर्धन आणि समाजहिताचे रक्षण व्हावे या हेतुने राष्ट्रीय पातळीवर पोटशाखा भेद, प्रांतभेद, भाषाभेद, बाजूला ठेऊन सर्व धनगर समाज एक होत आहे. या राष्ट्रीय प्रवाहात आपणास सहभागी करुन घेऊन आपल्या आजपर्यंतच्या समाज सेवेचा यथोचित गौरव करावा व आपणास आणखी विस्तारीत कार्यक्षेत्र उपलब्ध व्हावे. या हेतूने आम्ही आपली ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या महाराष्ट्र राज्य महासचिव पदी निवड करीत आहोत. सदरील पदाचा कार्यकाल एक वर्षाचा राहील.सदरील पदावर उत्कृष्ट कार्य करुन आपण समाजाने आपल्यावर टाकलेल्या विश्वासास आणि आदरास तडा जाऊ देणार नाही, असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ऑॅल इंडिया धनगर समाज महासंघाच्या महासचिव पदी सांगोला येथील श्री. प्रशांत लवटे यांची निवड झाल्याबद्दल सांगोला तालुक्यासह महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!