सांगोला तालुकाक्राईम

सांगोला शहर व तालुक्यात चोऱ्या आणि घरफोड्यांचा वाढता आलेख !

सांगोला शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे बाहेरून सांगोला शहर व तालुक्यामध्ये येऊन राहणाऱ्यांची संख्या सांगोला शहरासह सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे त्यातच परराज्यातून व्यवसायासाठी आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील लक्षणीय असून अनेकदा असे ही होते की आपल्या शेजारी कोण राहतो, याची नागरिकांनाही माहिती नसते त्याचादेखील फायदा चोरटे घेतात. शेजारी हाच खरा राखणदार असतो, याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताने शेजार्‍यांना सांगावे. तसेच, स्वतःच्या देखील सुरक्षिततेबाबत दक्ष राहण्याची आवश्यकता आहे पोलिसांकडे मनुष्यबळाची  कमतरता आहे  त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, यातच शहाणपण आहे शांतताप्रिय,व सुरक्षित शहर म्हणून सांगोला शहर ओळखले जाते. परंतु अलिकडे वाढत असलेली गुन्हेगारी पाहता ही ओळख पुसली जातेय की काय अशी भिती निर्माण होऊ लागली आहे अलीकडच्या काळात सांगोला शहरात आणि तालुक्यात विविध ठिकाणी खुना सारखे गंभीर गुन्हे घडले आहेत तर चोऱ्या,घरफोड्या, सोनसाखळी, मोबाईल, वाहनचोर्‍या आणि रात्री जबरी चोरीचे  प्रमाण वाढीस लागले आहेत.

दुष्काळी परिस्थिती सोबतच वाढत्या महागाईमुळे आर्थिक डबघाईतून सर्वसामान्य माणूस सावरू पाहात असताना पै-पै करून जमविलेल्या बचतीवर चोरटे डल्ला मारू लागले आहेत आगामी काळात या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना कधी व किती यश येते हे येणाऱ्या काळात दिसून येईलच मात्र वर्तमानातील परिस्थिती पाहता चोरट्यांचे धारिष्ठ्य चांगलेच वाढले आहे पूर्वी सांगोला शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते त्यामुळे गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात आणि घडलेल्या चोऱ्यांचे तपास करण्यात पोलिसांना मोठी मदत होत होती मात्र हे सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्ती अभावी बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मात्र असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे विदारक चित्र आहे.

खरं तर आपले सांगोला शहर आणि तालुका हे कायदा-सुव्यस्था व येथील सामाजिक वातावरणाच्या दृष्टीने खूप उत्तम व सुरक्षित तालुका म्हणून ओळखले जाते त्यामुळे उदरनिर्वाहासाठी सांगोला तालुक्याला प्रथम पसंती दिली जाते. नोकरी करणारे निवृत्तीनंतर राहण्यासाठी सांगोला शहराचीच निवड करतात त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे पण, अलिकडे शहरातील आणि तालुक्यातील गुन्हेगारीत वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी, मोबाईल चोरी, शेळ्या व बोकड चोरी या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच लाखोंचा ऐवज चोरण्याचे प्रकार घडू लागले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये घरफोड्या व वाहनचोर्‍या करणार्‍या चोरट्यांनी सांगोला शहर व तालुक्यात हैदोस घातला आहे दिवसाला शहर परिसरातील तसेच तालुक्यातील कोणत्या न कोणत्या ठिकाणी सांगोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्यांची मालमत्ता सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होत आहे सांगोला शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या भागात एकामागे एक होणार्‍या चोऱ्यांच्या घटनांनी तर सांगोल्यातील असुरक्षिततेच्या या भावनेला खतपाणीच घातले आहे.

 “डिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेन्शन” हे गुन्हेगारी रोखण्याचे तत्व आहे यामध्येच सांगोला पोलीस कमी पडताना दिसत आहेत अलीकडच्या काळात घरफोड्या रोखण्यात सांगोला पोलिसांना फारसे यश आले नाही असे असताना घरफोड्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून मात्र, घरफोडीच्या घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात पोलीस कमी पडत आहेत रात्रीच्या वेळी घरफोड्याचे प्रकार जास्त असतात या घरफोड्या होऊ नये म्हणून पोलिसांकडून घातली जाणारी गस्त कमी पडत आहे त्याचाच फायदा चोरटे घेतात असे बोलले गेल्यास वावगे ठरू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!