राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद बलवडी शाळेची दुर्वा शिंदे राज्यात प्रथम

राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी दूर्वा दिगंबर शिंदे या विद्यार्थिनीस 150 पैकी 150 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळवला आहे. तसेच इयत्ता दुसरीची अक्षदा सुदर्शन कवडे राज्य गुणवत्ता यादीत नववी व जिल्हा गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक व अभिज्ञा गणेश पंडित राज्य गुणवत्ता यादीत दहावा व जिल्हा यादीत पाचवा क्रमांक मिळवला आहे.
तसेच श्रीहरी ज्ञानेश्वर राऊत इयत्ता तिसरी, ओजस सतीश कारंडे इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शाळेमध्ये आयोजित केला होता. यावेळी बलवडी गावचे सरपंच मा.श्री ज्ञानेश्वर राऊत मुख्याध्यापक मा.श्री मनोहर पवार सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री बाळासाहेब खुळपे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष श्री चांगदेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य / व्यवस्थापन समिती सदस्य श्री शिवाजी शिंदे, व्यवस्थापन समिती सदस्य श्री बालिश सरोदे, व्यवस्थापन समिती सदस्या समृद्धी सुदर्शन कवडे मॅडम, बलवडी गावचे सुपुत्र तलाठी श्री गणेश पंडित सर, ग्रामस्थ श्री विलास बापू शिंदे, श्री सिद्धेश्वर शिंदे, श्री अगतराव शिंदे, श्री दत्तात्रय सांगोलकर, प्रगतशील बागायतदार श्री बंडू शिंदे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. बलवडी गावचे सुपुत्र श्री तलाठी श्री गणेश पंडित सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास व शिस्त विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री गोरखनाथ बनसोडे सर,श्री सागर गुरव सर, श्री विजयकुमार शिंदे सर , श्रीमती योगिता शांत मॅडम, श्रीमती स्वाती पाटील मॅडम, श्रीमती सोनल सावंत मॅडम यांनी परिश्रम घेतले. यावेळी निपुण कार्यक्रम अंतर्गत चावडी वाचनाचा कार्यक्रम ही घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री मनोहर पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गणेश पंडित सर यांनी केले.



