*चोपडी गावचे सुपुत्र शरद बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप*

नाझरा(वार्ताहर):- चोपडी गावचे सुपुत्र विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे शरद समाधान बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडी येथील गणेश नगर शाळेत विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शरद बाबर यांनी यापूर्वी त्या शाळेस अनेक शैक्षणिक साहित्य भेट दिली आहेत.त्याचबरोबर गावातील सिद्धनाथ मंदिर परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यासाठी व त्यांच्या संगोपनासाठी पाच हजार रुपये दिले आहेत.या कार्यक्रमास त्यांचे पिताश्री समाधान तात्या बाबर, त्यांचे बंधू आबासाहेब बाबर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगरचे मुख्याध्यापक राजाराम बनसोडे, सहशिक्षिका रूपाली पवार यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.यापुढील काळातही वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.