न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक प्रा. केशव माने, पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख स्मिता इंगोले मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपल्या मनोगतात बोलताना पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध यांनी सांगितले की,बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. त्यांच्या मागासलेपणाचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव होय ही गोष्ट शाहू महाराजांनी ओळखून बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले.१९०२ मध्ये राजर्षी शाहूंनी आपल्या राज्यातील सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.आपल्या राज्यात अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. अस्पृश्यांना शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी इत्यादी ठिकाणी समानतेने वागवावे, असे आदेश त्यांनी काढले.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख स्मिता इंगोले मॅडम यांनी केले तर आभार प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर यांनी मानले.