सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

सांगोला महाविद्यालय राज्यस्तरीय वाद–विवाद स्पर्धेत संभाजीनगरचा संघ प्रथम

सांगोला /प्रतिनिधी: सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयामध्ये  पाचव्या  राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेमध्ये संभाजीनगर (औरंगाबाद) येथील माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजचे  विद्यार्थी  सौरभ सुधीर औटे   आणि आदित्य ज्ञानेश्वर दराडे  यांनी  या स्पर्धेत सांघिक  प्रथम क्रमांक पटकाविला. अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे विद्यार्थी नागनाथ साळवे आणि कु. नेहा माने यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. सांगोला महाविद्यालयाची  विद्यार्थिनी कु.सृष्टी शिंदे आणि कु. सानिका शिंदे  यांनी तृतीय क्रमांक मिळविला.  या स्पर्धेत  सर्वोउत्कृष्ट वक्ता तारक शिवराज कॉलेज, गडहिंग्लजचा विद्यार्थी चारुदत्त माळी, सर्वोउत्कृष्ट वक्ता मारक आदित्य दराडे (संभाजीनगर) याची निवड करण्यात आली. वैयक्तिक उत्तेजनार्थ तारक क्रमांक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम खरात (वेश्वी ता.अलिबाग)  याने  तर वैयक्तिक  उत्तेजनार्थ मारक क्रमांक कर्मवीर भाऊराव पाटील महविद्यालय, पंढरपूरची विद्यार्थिनी कु. मोनाली पाटील (पंढरपूर) हिने मिळविला.

      या स्पर्धेचे उध्दाटन संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव म.सि.झिरपेसर, सदस्य मा.सुरेश फुले साहेब, आदी मान्यवराचे उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले हे होते. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ.यशपाल खेडकर (पंढरपूर). प्रा.मधुकर काळबागे (विटा), कु.अलिशा मोहिते  ( सांगली ) यांनी केलेमोबाईलमुळे आपली संस्कृती हरवत आहे /नाही  हा प्रस्ताव या वादविवाद स्पर्धेसाठी होता. या विषयावर राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांनी विचार मंथन केले.

            स्पर्धेचे संयोजक प्रा.संतोष लोंढे, डॉ. आर.जी. पवार, डॉ.विजयकुमार गाडेकर,  डॉ. विधीन कांबळे, डॉ.बबन गायकवाड, डॉ.नवनाथ शिंदे, प्रा. विशाल कुलकर्णी, डॉ.सदाशिव देवकर, प्रा. सचिन सुरवसे, प्रा. अनिस बागवान, प्रा.प्रसाद लोखंडे, अधीक्षक प्रकाश शिंदे, वरिष्ठ लिपीक विलास माने, लिपिक बापू  इंगोले, सुनील शिंदे, महादेव काशीद, बाबू इंगोले यांचेसह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : सांगोला महाविद्यालय राज्यस्तरीय व दिवस स्पर्धेत प्रथम पारितोषिक स्वीकारताना संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजचे विद्यार्थी प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश भोसले परीक्षक डॉक्टर यशपाल खेडकर प्राध्यापक मधुकर काळबागे कुमारी अलिशा मोहिते प्राध्यापक संतोष लोंढे प्राध्यापक नवनाथ शिंदे आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!