राजकारणाचा स्तर हा पद पैसा आणि सत्तेच्या पायरीवरती लाचार- डॉ.बाबाबासाहेब देशमुख

“लोकशाहीत राजकारण हे खुर्चीसाठी नसून लोकांच्या सेवेसाठी असते, विकासाची खोटी चित्रे रंगवून राजकारण होऊ शकत नाही.” मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या मूलभूत व पायाभूत विकासासाठी सलोख्याचे समाजकारण व राजकारण करून आमदारकीचं महत्व वाढविले ते आपले दैवत स्व आबासाहेबांनी…. पण आजकाल च्या या राजकारणाकडे आणि या बदललेल्या लोकप्रतिनिधींकडे पाहिलं की,राजकारणाचा स्तर हा पद पैसा आणि सत्तेच्या पायरीवरती लाचार झालेला दिसतो.
अक्षरशः जनतेच्या हिताच्या गोष्टींची या लोकप्रतिनिधींकडे वाणवा आहे . लक्ष आहे ते फक्त पद पैसा आणि टक्केवारीकडेच अपघाती मिळालेल्या या संधीचा उपयोग ,राजकारणाचा वापर हा समाजाच्या हितासाठी करावा नाहीतर जनता आहेच न्यायाकरिता उभी…!!! आपले दैवत स्व.आबासाहेबांनी घालून दिलेल्या तत्त्वांचे अनुसरण करून, शेतकरी कामगार आणि सर्व समाजाच्या प्रगतीसाठी संघर्ष आमचा सुरू ठेवू हाच आमचा संकल्प आहे…. बहुजनांच्या हितासाठी व जनतेच्या न्याय हक्कासाठी तत्पर आहे मी सदैव जनसेवेसाठी असे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या पोस्ट मधून नमुद केले आहे.