*नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये दहीहंडी उत्साहात संपन्न

नाझरा ( वार्ताहर):- नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल नाझरा मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न. प्रथम गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी पालक कन्हैया देशपांडे उपस्थित होते. तसेच नाझरा विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेज चे पर्यवेक्षक श्री विनायक पाटील सर, प्रा. महेश विभुते.सर्वप्रथम इयत्ता तिसरी व चौथीच्या र्विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे आला गाण्यावर डान्स केला. उत्सव विभाग प्रमुख कांबळे मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. देशपांडे पालकांनी सर्व मुलांना प्रसाद वाटप केला. नंतर सर्व मुलांनी मिळून वेगवेगळ्या गाण्यावरती डान्स केला.
सदर सोहळा पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका मंगल पाटील यांनी मार्गदर्शन केले. दहीहंडी कार्यक्रमसाठी श्रीकृष्ण बनुन इयत्ता सिनियर केजीचे विद्यार्थी व इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आले होते. श्रीकृष्णजन्माष्टमी बद्दल माहिती भडंगे मॅडम यांनी सांगितली . तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलदर मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार लोखंडे मॅडम यांनी केले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



