पक्षाशी बेईमानी करणार्या लबाड लोकांपासून सावध रहावे-श्रीकांतदादा देशमुख
सांगोला:- लोकसभा निवडणूक लागली आहे. तिसर्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण कामाला लागा, आपले मत पक्षाच्या उमेदवाराला देतोय, देशाच्या पंतप्रधानांना देतोय हे लक्षात ठेवा. भाजप पक्षाकडून काही लोकांनी मोठे मोठे पदे घेतले, प्रत्येक योजनेतून अमाप विकास निधी घेतला तेच लोक आता पक्षाला ब्लॅकमेल करत आहेत. अशा बेईमानी लोकांपासून सावध रहावे, असे आवाहन श्रीकांतदादा देशमुख यांनी केले.
सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा संवाद दौरा तालुक्यातील बलवडी गावात पोहोचला असून या दौर्यात त्यांच्यासोबत सांगोलाचे माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, भटक्या विमुक्त जाती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विजय इंगवले, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे मारुती कांबळे, जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे विकास वलेकर , भाजपा संघटक माणिकराव सकट, गौडवाडी चे ग्रामपंचायत सदस्य महादेव आलदर, अशोक कांबळे, ओबीसी मोर्चाचे डॉ.धनाजी पारेकर, जिल्हा युवा मोर्चाचे चंद्रकांत कावळे, पाचेगावचे महेश गुरव इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्रीकांतदादा देशमुख बोलत होते.
यावेळी श्रीकांतदादा देशमुख म्हणाले की, 2017 ला दुष्काळी परिस्थिती तालुक्यात होती त्यावेळीही या भागाचा पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा, डाळिंब भागाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु बलवडी येथील संभाजी यादव, हणमंत वाघमोडे, समाधान शिंदे यांच्या शिष्टमंडाने माझ्याकडे पाण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समक्ष जाऊन केली व पहिल्यांदा माण नदीत पाणी सोडले. त्याप्रमाणे या दुष्काळी परिस्थितीतही वरिष्ठ नेते, अधिकारी यांना भेटून जिल्हाधिकारी यांच्या टंचाई अधिकारातून पाणी माण नदी सोडण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविक हणमंत वाघमोडे सर व विलास वलेकर सर यांनी केले. श्रीकांतदादा व मान्यवरांचा फेटे बांधून गुलाब पुष्प श्रीफळ देऊन बलवडी गावचे सरपंच ज्ञानेश्वर राऊत, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी तात्या यादव , ग्रामपंचायत सदस्य सुरेश गुरव, सुरेश शिंदे, अंकुशराव करडे , सिद्धेश्वर शिंदे, फैजुद्दीन शेख यांनी केले.
हणमंत वाघमोडे सरांनी व सर्व शेतकरी बांधवांनी दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाई मधून टेंभू योजनेचे पाणी मान नदीत सोडून बंधारे भरावेत व पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा, डाळिंब बागा वाचविण्याचा प्रश्न सोडवावा वरिष्ठापर्यंत आमची मागणी श्रीकांतदादांनी पोहोचवावी अशी मागणी केली.
दुधासाठी दिलेले लिटर मागे 5 रुपयांच्या अनुदान सर्व दूध उत्पादक शेतकर्यांना त्वरित मिळावे अशी मागणी डॉ.धनाजी पारेकर यांनी केली. शेतकरी किसान सन्मान योजनेत राहिलेल्या शेतकर्यांचा समावेश व्हावा, डिशनल डीपी व इतर छोट्या मोठ्या समस्या ही प्रकाश बदडे व ग्रामस्थांनी शेतकर्यांनी मांडल्या. सिद्धनाथ मंदिरावरच्या छतावर पत्राशेड करण्याचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य सुरेश गुरव यांनी दिले.
सदर बलवडी गाव भेट संवाद दौर्याच्या कॉर्नर सभेचे आयोजन अल्पसंख्यांक मोर्चाचे फैजुद्दीन शेख, सिद्धेश्वर शिंदे, सुरेश शिंदे, अमोल सांगोलकर, सचिन धायगुडे, संभाजी सांगोलकर, हणमंत वाघमोडे, दत्ता निंबाळकर, संजय करडे, अंकुश करडे, महेश गुरव, प्रकाश बदडे, दत्तात्रय बदडे, यशवंत शिंदे, नवनाथ कारंडे, बलभीम देवकर, नवनाथ करडे, रामभाऊ सांगोलकर, अमित खुळपे यांनी केले होते.