शैक्षणिकमहाराष्ट्र

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १० विद्यार्थ्यांचे ‘गेट’ परीक्षेमध्ये उज्वल यश

पंढरपूर- तंत्रशिक्षणामध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील गेट‘ (ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) या परीक्षेमध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १० विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. गेट‘ या परीक्षेत प्रत्येक वर्षी स्वेरीचे विद्यार्थी चमकतात. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरचे प्र- कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्तेस्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. पी.एम. पवारसर्व अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्ग व पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.        

        राष्ट्रीय स्तरावरील गेट’ या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आणि आय.आय.एस.सी. आणि आय.आय.टी. या उच्च तंत्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या गेट-२०२४‘ या परीक्षेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील गणेश राजाराम कचरेअमोल दत्तात्रय जाधवसंजीवनी राहुल अनुसेसौरभ सुनील गायकवाडमधुरा रघुनाथ कुलकर्णीवैष्णवी बापूराव फरड व वैष्णवी पांडुरंग ताटेमेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील पवन राजेंद्र शिंदे व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील कार्तिक बापू कांबळे व सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील सुरज राजेंद्र झव्हेरी असे मिळून एकूण १० विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणारे गणेश कचरे हे देशातून ३९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. अत्यंत अवघड स्वरुपाच्या असणाऱ्या या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची आणि उच्च करिअरची दारे खुली होत असतात. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांचे विद्यार्थ्यांसाठीचे विकासात्मक धोरणनियोजनात्मक मार्गदर्शन आणि उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने स्वेरीत गेट‘ परीक्षेची तयार करून घेतली जाते. यामध्ये प्रत्येक वर्षी विविध विषयांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. या व्यतिरिक्त ॲडव्हान्सड टेक्निकल ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा परीक्षांसाठी आवश्यक संपूर्ण तयारी करून घेतली जाते. वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या टेस्ट आणि त्यांचे विश्लेषण यामधून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणातील अद्ययावत माहिती मिळते. त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांना अशा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळते. या परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारे सर्व स्टडी मटेरियल हे स्वेरीच्या नूतन इमारतीत असलेल्या मुख्य लायब्ररीमधून उपलब्ध करून दिले जाते. तसेच गेट ट्यूटर‘ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गेट‘ संदर्भात अधिक माहिती मिळून परीक्षेच्या दृष्टीने सखोल तयारी करण्यास मदत मिळते.

 

 गेट‘ ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आय.आय.टीएन.आय.टी. सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. त्याबरोबरच या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पब्लिक सेक्टर‘ मधील कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या आणि उच्चपदाच्या नोकरीसाठी संधी मिळतात. स्वेरीचे अभियांत्रिकी महाविद्यालय हे वार्षिक परीक्षांचे निकालप्लेसमेंट व प्रत्येक वर्षाची प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या महत्वाच्या बाबीमध्ये कायम अग्रेसर राहिलेले आहे. या १० विद्यार्थ्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. पी.एम. पवारकॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.स्वाती पवारमेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसलेइलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे व  इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. गेट परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या या विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम. पवारस्वेरी अंतर्गत असणाऱ्या डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळबी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियारडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे….गेट परीक्षेचे समन्वयक प्रा.एम.ए.देशमुखप्रा.व्ही.व्ही. राजमानेडॉ.एम.जी. देशमुखप्रा. एस.ए.गरडप्रा. एस.एम.काळे यांच्यासह अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापकवर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!