कोळेकर महास्वामींच्या नूतन मठाचे, सभागृहाचे व व्यापारी संकुलाचे दिघंची येथे उद्घाटन संपन्न

रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने दिघंची ता. आटपाडी येथे महास्वामीच्या मठाचे, सभागृहाचे व व्यापारी संकुलाचे कोळेकर महास्वामींच्या अमृत हस्ते व महादेव महाराज तसेच मठाचे चेअरमन महादेव अण्णा चिवटे यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.
सुरुवातीस महास्वामींचे, महादेव महाराज यांचे तसेच चेअरमन महादेव अण्णा चिवटे, सचिव गणेश नकाते, सदस्य बबनराव भंडारे, विनायक लोखंडे, पिंटू शीलवंत, रूपालीताई गाढवे, धोंडीराम बोधिगिरे, इंजिनीयर प्रमोद रसाळ, पत्रकार रविराज शेटे, चिदानंद शास्त्री, दिघंची सरपंच माधुरी मोरे, वीरेश शास्त्री, योगेश स्वामी, विजयानंद स्वामी, वीरशैव पतसंस्थेचे चेअरमन भारत जवळे, व्हाईस चेअरमन दिलीप लिगाडे, लोखंडे गुरुजी, राष्ट्रवादी अध्यक्ष हनुमंतराव देशमुख, गाळेधारक अमित जवळे, मिलिंद होनराव, चंद्रकांत गाढवे, योगेश वाघिरे, राहुल मेनकुदळे, प्रणिती शेटे, नितीन होनराव, प्रभुराज टिंगरे, मधुकर शेटे, कैलास गोटे, मुगेंद्र शेटे, कुमार बापू इत्यादींचा दिघंची वीर शैव समाजातर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी वीर शैव समाज अध्यक्ष कैवल्य शेटे व माजी अध्यक्ष नानासाहेब मेनकुदळे यांनी बाहेरील कोणताही निधी न घेता इमारत उभी करण्यासाठी सर्व समाज बांधवांचे योगदान व कोळेकर महास्वामींचा आशीर्वाद त्यामुळे आज हे वैभव दिसत आहे व त्याबद्दल सर्वांचे आम्ही ऋणी आहोत असे सांगितले.
गुरु हे परब्रम्ह आहे व मनातील अहंकार, क्रोध, मोह, माया नष्ट करून शिवाचे ध्यान करा तर पोटाची भूक भागवा जिभेची नव्हे, भोजन करणे पुण्याचे काम आहे पण जिभेचे चोचले पुरवणे पाप आहे व आती खाण्याने पोट बिघडते व यासाठी जीभ व जेवण यावर ताबा ठेवा म्हणजे जीवन सुधारेल असे कोळेकर महास्वामिनी आशीर्वाचनात सांगितले. यावेळी महादेव महाराज यांनीही प्रत्येक समाज बांधवांनी दीक्षा घेऊन लिंगधारणा करा असे सांगितले. यावेळी अजयकुमार भिंगे, संगम डोंबे, राहुल घोंगडे, पोपटराव मेनकुदळे, कैवल्य शेटे,अजित भिंगे, दिलीप दादा भिंगे, सचिन राजमाने यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व समाज बांधव महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन रूपालीताई गाढवे यांनी तर आभार अरुण टिंगरे यांनी मानले.