फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये ‘माधवबाग ’च्यावतीने रक्त तपासणी शिबीर संपन्न

सांगोला : सुदृढ व निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे. आपण निरोगी राहण्यासाठी आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होणारच नाही यासाठी जागरूक असले पाहिजे. सर्व वयोगटातील व्यक्तींना अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होऊ शकतात. हे टाळ ण्यासाठी वेळोवेळी रक्त तपासणी गरजेची आहे. म्हणूनच फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, मध्ये रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे यांनी दिली.
या तपासणीसाठी माधवबाग चे डॉ. सुमोद दोशी, सचिन समिंदर, रमेश सुतार, कमलकांत चाडोकर यांचे सहकार्य लाभले. या शिबिरास सुमारे ११० कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांनी याचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, यांच्या मार्गदर्शनाखाली व मॅनेजिंग डायरेक्टर मा.डॉ.अमित रुपनर ,कार्यकारी संचालक मा.श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे , संचालक डॉ. डी.एस. बाडकर , प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे, फार्मसी चे प्राचार्य डॉ.संजय बैस , शैक्षणिक डीन – डॉ. वागेशा माथाडा, विद्यार्थी डीन – डॉ.शरद पवार,प्रा.धनंजय शिवपूजे श्री.राजेंद्र पाटील उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. राजेश जाधव व श्रीमती संगीता स्वामी यांनी केले.