सोलापूर जिल्हा तायक्वान दो असोसिएशन मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सांगोला शाळेत स्वसंरक्षक प्रशिक्षण*

-सांगोला -जागतिक महिला दिनाचे निमित्ताने सोलापूर जिल्हा तायक्वान दो असोसिएशन मार्फत जिल्हा परिषद उर्दू शाळा सांगोला येथील शाळेतील 5,6,7, व 8 च्या वर्गातील मुलींना एक आठवड्याचे स्वसंरक्षक प्रशिक्षण आयोजित केले होते,
सदरच्या प्रशिक्षण हे धावपळीच्या युगात स्वतःच्या मेंटली फिटनेस बरोबर फिजिकल फिटनेस सोबतच आत्मसंरक्षण करणे ही जरुरीचे असल्याने सदरच्या प्रशिक्षण मध्ये एक्सरसाईझ,पॅंचेस, ब्लॉक, किक्स, सेल्फ डिफेन्स, हॅन्डमूव्हमेंट टेक्निक अश्या विविध प्रकारचे स्वसंरक्षक प्रशिक्षण देण्यात आले,सदरचे प्रशिक्षण मा. प्रमोद दौंडे नॅशनल गेम्स प्लेअर यांचे मार्गदर्शनाखाली पडले,
सदरचे प्रशिक्षणा यशस्वी पारपाडणे कामी शाळेचे मुख्याध्यापक श्री फारूक भुसारी .सर श्री अकलाक शेख सर श्रीमती शमीम शेख मॅडम यांनी परिश्रम घेतेले