सांगोला तालुकाशैक्षणिक

कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये रंगपंचमी साजरी.

सांगोला तालुक्यातील कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयय स्कूल मध्ये रंगपंचमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.रंगपंचमी म्हणजे बच्चे कंपनीला एक पर्वणीच. नैसर्गिक रंगांची उधळण करीत पर्यावरणपूरक व आनंददायी रंगपंचमी उत्सव साजरा करण्याचा संकल्प कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयय स्कूल मधील विद्यार्थ्यांनी  केला.
रंगपंचमीनिमित्त बाजारपेठा विविध पिचकार्‍या व रासायनिक रंगांनी सजल्या होत्या. रासायनिक रंगांमुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शिक्षकांनी नैसर्गिक रंगाचे महत्व तसेच भाज्या, फळे, फुले यापासून रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले.
नैसर्गिक कोरड्या रंगांचा वापर करून सण आणि चित्रकला यांचा मेळ साधत विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांचे चेहरे आकर्षक पद्धतीने रंगविले. तसेच स्कूल मधील शिक्षकांनी रासायनिक रंगांमुळे त्वचेवर होणार्‍या दुष्परिणामांची माहिती दिली. तसेच रंगपंचमी खेळताना कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती दिली. रासायनिक रंगांनी रंगपंचमीच्या सणात रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून नैसर्गिक रंगांची कोरडी रंगपंचमी हाच सणाचा मुख्य उद्देश झाला पाहिजे.
दरम्यान, पालेभाज्या, फळे, फुलांपासून तयार झालेल्या नैसर्गिक रंगांनीच पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश यावेळी विद्यार्थीना देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!