*सांगोला विद्यामंदिरमध्ये सोमवारपासून इ.११ व १२ वी सीईटी मार्गदर्शन वर्गास सुरूवात*
सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला व सांगोला परिसरामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी व विद्यार्थ्यांना गुणात्मक व रचनात्मक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांनी १९५२ मध्ये सांगोला विद्यामंदिरची स्थापना केली. स्थापनेपासून विद्यामंदिर गुणवत्तेत अग्रेसर आहे. सद्यस्थितीला बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना यश मिळावे हा हेतू ठेवून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सोमवार दिनांक १ एप्रिल २०२४ पासून (इ.११ वी २०२४-२५ व इ.१२ वी २०२५-२६ साठी) सीईटी मार्गदर्शन वर्गास सुरूवात होत आहे.
या मार्गदर्शन वर्गाच्या अधिक माहितीसाठी प्रा.मिलिंद देशमुख (९६८९७९५९९७),श्री.शिवाजी चौगुले ( ७५८८५०६०७१) यांच्याशी संपर्क करावा.व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले आहे.
इयत्ता दहावी ( एस एस सी) परीक्षा दिलेल्या सांगोला तालुका व इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडन्स व CET, JEE, NEET या परीक्षेसाठी फाउंडेशन कोर्स या संदर्भात विद्यार्थी व पालकांसाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सोमवार दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सहविचार सभा होणार आहे.