सांगोला तालुकामहाराष्ट्र

सांगोला तालुका अवकाळी पाऊस: वीज पडून 1 महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर दोन गायींचा मृत्यू

सांगोला(प्रतिनिधी): तालुक्यात सुसाट वाहणारे वादळी वारे व अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून, पाचेगाव बुद्रुक येथे अंगावर वीज पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर आलेगाव येथे वीज पडून दोन गायीचा जागीच मृत्यू झाला. तसेच घेरडी येथे वीज पडल्याने आग लागून 1200 पेंडी कडबा जळाला.

सांगोला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी तापमानामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. अशातच शुक्रवारी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.

अवकाळी पावसात पाचेगाव बुद्रुक येथे शनिवारी सायंकाळी  सहाच्या सुमारास अंगावर वीज पडून संगीता भारत बागडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला.आलेगाव येथे शनिवारी सायंकाळी 6:30 च्या सुमारास सयाजी निवृत्ती बाबर यांच्या शेतात बांधलेल्या दोन जर्सी गायीचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घेरडी येथील अमोल शिवाजी गरंडे यांच्या शेतातील 1200 पेंडी कडबा वीज पडून जळून खाक झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!