एकनाथ षष्ठी निमित्त विविध कार्यक्रम

सांगोला – शहरातील विविध मंडलातर्फे व विविध ठिकाणी संतश्रेष्ठ एकनाथ षष्ठी निमित्त विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील मनिषा ठोंबरे यांच्या निवासस्थानी दर वर्षी महिला भजनी मंडळ सेवा देत असते.
या वर्षी यमाई महिला भजनी मंडळाने भजन सेवा सादर केली.त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.या कार्यक्रमात महिला सूत गिरणीच्या संचालक पदी निवड झाल्या बद्दल नम्रता जोशी यांचा यमाई भजनी मंडळाच्या वतीने माधुरी कुलकर्णी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच जोशी यांचा ठोंबरे परिवारातर्फे मनीषा ठोंबरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला..
केसरी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या महाराष्ट्राचा महाकवी या ऑन लाईन काव्य स्पर्धेत सुयश प्राप्त केल्याबद्दल मनीषा ठोंबरे यांचा यमाई भजनी मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.