फॅबटेक इंजिनिअरिंगमध्ये नक्षत्र २ के -२०२४’ उत्साहात साजरा

सांगोला : येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिअरिंग आणि रिसर्च मध्ये ‘नक्षत्र २ के -२०२४’ सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. चार दिवस चाललेल्या या कार्यक्रमात कला आणि क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी, क्रिकेट, टेबल टेनिस, बेस, कॅरम सोबत सांस्कृतीक कार्यक्रमात आर्ट गॅलरी,फूड स्टॅल, ट्रॅडिशनल डे, बॉलिवूड डे, रॅम्प वॅक, फिश पॉण्ड या स्पर्धा घेण्यात आल्या. या सोबत नृत्य, गीत, फैशन शो, एकांकिका इ. कलाविष्कार सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, सौ. सुरेखा रुपनर,मॅनेजिंग डायरेक्टर मा.डॉ.अमित रुपनर , कार्यकारी संचालक मा.श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, संचालक डॉ. डी.एस. बाडकर , प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले, पब्लिक स्कूल चे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, शैक्षणिक डीन – डॉ. वागेशा माथाडा, विद्यार्थी डीन – डॉ.शरद पवार, श्री. राजेंद्र पाटील उपस्थित होते.
विविध स्पर्धा मध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अभ्यासेत्तर उपक्रमातील मिळालेल्या यशाबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल मेटकरी,प्रा. कुबेर ढोपे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी शंकर दुधाळ,तोहीद गंजीवाले ,ऐश्वर्या इंगवले ,अर्पिता शिंदे,सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.