सांगोला तालुकाशैक्षणिक

प्राचार्य हेमंत आदलिंगे सेवानिवृत्त

सांगोला /- सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु.कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे काल शासकीय नियमानुसार वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपल्या पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.
इयत्ता अकरावी – बारावी साठी रसायनशास्त्र विषयाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम केले असून बारावी साठी परीक्षक व नियामक म्हणून उत्कृष्ठ काम केले आहे. न्यू इंग्लिश स्कूल ज्यु.कॉलेजच्या स्थाप नेपासून  ते सेवेत होते.प्रदीर्घ सेवेनंतर ते उपप्राचार्य व नंतर प्राचार्य झाले. स्व.आमदार गणपतराव  देशमुख यांच्या मार्गद्शनाखाली व त्यांच्या संस्थेत व सहवासात शिक्षणाची सेवा करण्याचे भाग्य लाभले असल्याचे मत त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!