रोटरी क्लब ऑफ सांगोला व चौगुले सायन्स क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबिर संपन्न

चौगुले सायन्स क्लासेस सांगोला, येथे रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्या वतीने मुली व महिला विषयी कायदे याबद्दल मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत क्लासचे संचालक प्रा. संजय चौगुले सर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रो. विकास देशपांडे (अध्यक्ष रोटरी क्लब, सांगोला )यांनी केले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड .सचिन पाटकुळकर, ॲड. विशाल बेले, ॲड .गायकवाड, रो.माणिक भोसले हे उपस्थित होते.
ॲड. सचिन पाटकुळकर यांनी महिला कायद्याची ओळख करून दिली. ‘पोक्सो’ कायदा, पोटगी, लिव्ह-इन-रिलेशनशिप याबद्दल सविस्तर माहिती दिली. महिलांवर अत्याचार झाल्यानंतर कशाप्रकारे याचे निवारण करावे हे सांगितले. कायदेविषयक कलमांची बहुमोल माहिती दिली.
ॲड. विशाल बेले यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचार व निवारण कायदे समजावले. ‘इलेक्ट्रॉनिक ॲक्ट’, ऑनलाईन फिर्याद याबद्दल चर्चा केली. स्वसंरक्षणासाठी कायद्यासोबतच मुलींनी व्यायामाची सवय अंगीकारावी असे मत मांडले मानले.
मा.श्री. गायकवाड यांनी हिंदू मॅरेज ॲक्ट, हुंडाबंदी याची माहिती दिली महिलांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे व वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रियांचे योगदान रो. माणिक भोसले साहेब यांनी समजावले. शासकीय सेवेत वेगवेगळ्या विभागामध्ये सर्वोच्च स्थायी असलेल्या महिलांचे महत्त्व सांगितले.