मातोश्री गिरीजाबाई ढोबळे विद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी दीनानाथ रणदिवे हिला राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये गोल्ड व सिल्वर मेडल

शोटोकॉन स्पोर्ट्स कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन व शाओलीन वर्ल्ड मार्शल आर्ट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे झालेल्या ओपन स्टेट कराटे कॉम्पिटिशन मध्ये मातोश्री गिरीजाबाई ढोबळे पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सांगोला मधील इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी साक्षी दीनानाथ रणदिवे हिने कता या प्रकारामध्ये गोल्ड व कुमिते फाईट या प्रकारामध्ये सिल्वर मेडल पटकावले
साक्षी रणदिवे हिला वाघमारे सरांच्या कराटे क्लासेस मधून कराटे प्रशिक्षक सुनील वाघमारे सर व कराटे प्रशिक्षिका श्रावणी वाघमारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तिच्या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या प्रमुख वैशाली शिंदे ,माध्यमिकचे मुख्याध्यापक दिगंबर कानगुडे ,डी. एल. एडविभाग प्रमुख स्वाती पाटोळे बीएड विभाग प्रमुख शितल गयाळी,बीएड कॉलेजचे प्राचार्य साधू गरंडे, विद्यालयाच्या समन्वयिका अर्सिका खतीब ,डीएड कॉलेजचे प्राचार्य व स्थानिक व्यवस्थापक सर्फराज खतीब सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी साक्षीचे कौतुक केले व तिच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या