कोळा येथील कुटुंबीयांचे सेक्युलर मूव्हमेंट चे गौतमीपुत्र कांबळे व भरत अण्णा शेळके यांनी केले सांत्वन

सांगोला/प्रतिनिधी – तालुक्यातील कोळा येथे 23 मार्च रोजी दोन गटात झालेल्या मारहाणीत दोघांचे खून झाले होते. सदर मयताच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी सेक्युलर मुव्हमेंट चे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे व कार्याध्यक्ष भरत(आण्णा) शेळके यांनी त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.
त्यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी सांगितले की, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक समाज बांधवांनी सजग राहून सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.
त्याचबरोबर भरत आण्णा शेळके यांनी आपले मत मांडताना म्हटले की, फार पूर्वीपासून कोळा गावात सर्व समाजाचे लोक गुण्यगोविंदाने राहत आहेत. त्याच्या एकीचे किस्से तालुकाभर चर्चिले जात होते. पण सध्या काही समाजकंटक ही शांतता भंग करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण कोळा गावाचे सुजाण नागरिक अशा कोणत्याही गोष्टीला थारा देणार नाहीत. तसेच मोरे व आलदर कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या दुःखात सेक्युलर मुव्हमेंट सहभागी आहेत. त्याचबरोबर पुढील काळात मयताच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.
यावेळी पंचशील अभियानाचे समन्वयक ऍड. सुनिल जगधने, सूर्यकांत शेळके, विक्रम शेळके, रवि साबळे, अशोक कांबळे(सांगली), प्रविण बनसोडे, सूरज कांबळे, रमाई महिला मंडळ पाचेगाव बु. येथील महिला कार्यकर्त्या व कोळा गावचे समाजबांधव उपस्थित होते.